• Sat. Sep 21st, 2024

तीन दिवसातून एकदा पाणीपुरवठा, दुष्काळाच्या झळा वाढल्या, खातगुण ग्रामपंचायतीचा मोठा निर्णय

तीन दिवसातून एकदा पाणीपुरवठा, दुष्काळाच्या झळा वाढल्या, खातगुण ग्रामपंचायतीचा मोठा निर्णय

सातारा : सातारा जिल्ह्यातील खातगुण गावात जानेवारीपासूनच पाणीटंचाई जाणवू लागली आहे. गावासमोर पाण्याचे भीषण संकट उभे आहे. गावात काही ठिकाणी नवीन बोअरवेल घेण्याचे निदर्शनास आले. त्यामुळे ग्रामपंचायतीने प्रथमच महाराष्ट्र भूजल अधिनियम, २००९ चे कलम लागू केले आहे. पाण्याच्या पाण्यासाठी सद्यस्थितीत असलेल्या सार्वजनिक स्त्रोताच्या ५०० मीटर परिघात बोअरवेल किंवा विहिरी खोदण्यास बंदी घातली आहे. सुमारे पाच हजार लोकसंख्या असलेल्या या गावात पाण्याच्या भीषण टंचाईच्या संकटावर मात करण्यासाठी हे महत्वपूर्ण पाऊल उचलले आहे.

सातारा जिल्ह्यासह खटाव तालुक्यात यावर्षी कमी पाऊस पडल्याने पाण्याचे स्त्रोत लवकर आटले आहेत. त्यामुळे तीव्र पाणीटंचाईला नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. नागरिकांना खासगी कूपनलिकेवर अवलंबून राहावे लागत आहे. दिवसेंदिवस बोअरवेल वाढत असून त्यातच पाणीपातळी कमी झाल्याने बहुतांश कूपनलिका बंद पडल्या आहेत.
…तोपर्यंत आमदारकीची निवडणूक लढणार नाही, जयकुमार गोरेंचा देवेंद्र फडणवीसांसमोर संकल्प जाहीर
खातगुण गावात सद्यस्थितीत गावाला दोन विहिरी व तीन बोअरवेलद्वारे तीन दिवसांतून एकदा पाणी पाणीपुरवठा केला जात आहे. हेही पाणी लोकांना कमी पडत असल्यामुळे आणि भविष्यात पाणीटंचाईची यापेक्षा बिकट परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून दक्षता घेतली गेली आहे.
Read Latest Maharashtra News And Marathi News
डोंबिवलीकरांसाठी आनंदाची बातमी; पाणी पुरवठा समस्येवर मोठा दिलासा
यावेळी सरपंच अमिना सय्यद म्हणाल्या, “दरवर्षी उन्हाळ्यात पाणीटंचाईला तोंड द्यावे लागते. आम्हाला असे आढळून आले की, लोक पाण्यासाठी बोअरवेल खोदतात आणि जर दुसरा स्रोत जवळ असेल, तर ती बोअरवेल कोरडी पडते. त्यामुळे आम्ही ग्रामसभा बोलवण्याचा निर्णय घेतला. ग्रामसभेमध्ये पाणीटंचाईवर चर्चा करून नवीन बोरवेल खोदण्यासाठी प्रतिबंध कसा घालता येईल यावर चर्चा केली त्या चर्चेतून सद्यस्थितीत असलेल्या सार्वजनिक स्त्रोताजवळ बोअरवेल खोदण्यावर बंदी घालण्याचा सर्वानुमते निर्णय घेण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed