• Sun. Jun 14th, 2026
    Navi Mumbai Crime: घरात घुसून 45 वर्षीय महिलेला निर्घृणपणे संपवलं; तुर्भे गावातील घटना

    Navi Mumbai Crime: ४५ वर्षीय महिलेची तिच्या राहत्या घरातच हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे. कोणत्या कारणातून घटना घडली त्याचे गूढ कायम आहे.

    घरात घुसून महिलेची हत्या(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    म.टा.वृत्तसेवा, नवी मुंबई: तुर्भे गावात राहणाऱ्या एका ४५ वर्षीय महिलेची तिच्या राहत्या घरात घुसून निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी संध्याकाळी उघडकीस आली. मार्जिना मंडल (४५) असे मृत महिलेचे नाव असून, ही हत्या नेमक्या कोणत्या कारणातून झाली, याचे गूढ अद्याप कायम आहे. एपीएमसी पोलिसांनी याप्रकरणी अज्ञात मारेकऱ्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करुन त्याचा शोध सुरु केला आहे.

    मार्जिना मंडल या तुर्भे गावातील सेक्टर-२२ मधील शंकर भोईर यांच्या पहिल्या मजल्यावरील खोलीत एकट्याच राहत होत्या. त्या घरकाम करून आपला उदरनिर्वाह करत होत्या. शुक्रवारी सायंकाळी त्या घरामध्ये एकट्याच असताना, त्यांच्या घरामध्ये घुसलेल्या अज्ञात मारेकाऱ्याने मार्जिना यांच्या छातीवर धारदार चाकूने वार करुन त्यांची हत्या करुन पलायन केले. सायंकाळी ६.५० च्या सुमारास याच इमारतीत काम करणारे काही कामगार खाली उतरत असताना, त्यांना मार्जिना त्यांच्या खोलीमध्ये रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या दिसून आल्या.

    Maharashtra TimesMumbai Crime : भांडुपमध्ये निवृत्त बेस्ट कर्मचाऱ्याला 39 लाखांचा गंडा; ‘पोलीस’ असल्याचं सांगत घरातच केलं ‘डिजिटल अरेस्ट’
    या घटनेची माहिती मिळताच एपीएमसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पंचनामा करुन मृतदेह ताब्यात घेतला असून तो उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे. प्राथमिक तपासात अज्ञात मारेकऱयाने धारदार शस्त्राने वार करुन ही हत्या केल्याचे समोर आले आहे.

    Maharashtra TimesMumbai Crime : डॉ कुलकर्णी ऑपरेशनसाठी आल्या नाहीत? रुग्णालयात धावाधाव, कार्यालयात पाहिलं, महिला डॉक्टरने प्राण सोडलेले
    मालगाडीची धडक; तीन मित्रांचा जागीच मृत्यू

    पश्चिम रेल्वेवरील पालघर रेल्वे स्थानकानजीक मालवाहू गाडीने धडक दिल्याने तीन तरुणांचा शुक्रवारी सायंकाळी उशिरा जागीच मृत्यू झाला. स्थानकाच्या उत्तरेकडे असलेले फाटक बंद असल्याने ते रूळ ओलांडत होते. स्वप्नील पालांडे (२३), अफरोज शेख (२७) आणि कुणाल वैद्य (२०) अशी मृत तरुणांची नावे आहेत. वीरेंद्रनगर भागात राहणारे हे तिघे एकमेकांचे मित्र होते. पूर्वेतील गांधीनगर परिसरातून परतत असताना मालगाडीने त्यांना धडक दिली. रेल्वे पोलिस ठाण्यात या अपघाताची नोंद करण्यात आली. पालघर रेल्वे स्थानक परिसरात गेल्या काही वर्षांपासून रूळ ओलांडताना होणाऱ्या अपघातांचे प्रमाण वाढले आहे. रेल्वे प्रशासनाने जुना पालघर येथील हनुमान मंदिराजवळील अधिकृत रेल्वे क्रॉसिंग पूर्णपणे बंद केले आहे.

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये ३ वर्षांपासून कन्सल्टंट म्हणून कार्यरत आहे.या आधी सकाळ मिडियामध्ये २ वर्ष कामाचा अनुभव आहे. चालू घडामोडी, गुन्हेगारी, राजकीय विषयांच्या बातम्यांत विशेष आवड.… आणखी वाचा