Beed Crime News : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे. अशातच बीडमध्ये एक संतापजनक प्रकार समोर आला आहे. या घटनेनं संपूर्ण परिसरात संतापाची लाट पसरली आहे.
पाशवी अत्याचार आणि क्रूरतेचा कळस
नदीकाठी नेल्यानंतर आरोपीने पीडितेवर पाशवी अत्याचार केले. या नराधमाचा राक्षसीपणा एवढ्यावरच थांबला नाही. अत्याचारानंतर पीडिता बेशुद्ध पडली होती. आरोपीने तिला त्याच अवस्थेत पुन्हा गावात आणले आणि गावच्या सार्वजनिक चावडीवर असलेल्या एका खांबाला दोरीने घट्ट बांधून ठेवले. रात्रभर ती पीडित महिला उघड्यावर, बांधलेल्या अवस्थेत मदतीसाठी आसुसलेली होती, मात्र कोणालाही या प्रकाराची पुसटशी कल्पना आली नाही.
Maharashtra Weather: महाराष्ट्रात पावसाची स्थिती, उष्णतेचा कडाका कमी होण्याची शक्यता; हवामान खात्याने वर्तवला अंदाज
सकाळी उघड झाला प्रकार
दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा गावकरी आपल्या कामासाठी घराबाहेर पडले, तेव्हा त्यांना चावडीवर एक महिला बांधलेल्या अवस्थेत दिसली. हे भीषण दृश्य पाहून संपूर्ण गाव हादरून गेले. गावकऱ्यांनी तातडीने तिची सुटका केली आणि घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांना पाचारण केले.
पोलिसांची कारवाई आरोपीला कोठडी
घटनेची माहिती मिळताच पिंपळनेर पोलीस आणि महिलांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेले पिंक पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पीडितेचा जबाब नोंदवून घेत वेगाने तपास चक्रे फिरवली आणि मुख्य आरोपी वैभव पटेकर याला बेड्या ठोकल्या.पोलिसांनी आरोपीला न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी आणि कृत्याचे गांभीर्य लक्षात घेऊन त्याला १७ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
Pune Metro: पुण्यात मेट्रो स्थानकांपासून ‘फीडर बस’सेवेसाठी पावले, PMPला नवा पर्याय; पहिल्या टप्प्यात दोन मार्गांसाठी प्रस्ताव
या घटनेमुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. अशा नराधमांना समाजात स्थान नसून त्यांना कठोरातील कठोर म्हणजे फाशीचीच शिक्षा झाली पाहिजे, अशी आक्रमक मागणी ग्रामस्थांनी आणि महिला संघटनांनी केली आहे. सध्या विशेष पिंक पथक या प्रकरणाचा अधिक तपास करत असून, पीडितेच्या विदारक स्थितीमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
