• Sat. Jun 6th, 2026

    Chhatrapati Sambhajinagar: आणखी दोन ऑटो गॅस सेंटरवर ‘नो स्टॉक’चे बोर्ड; सेव्हन हिल गॅस सेंटरमधूनही गॅस विक्री बंद

    Chhatrapati Sambhajinagar: आणखी दोन ऑटो गॅस सेंटरवर ‘नो स्टॉक’चे बोर्ड; सेव्हन हिल गॅस सेंटरमधूनही गॅस विक्री बंद

    Chhatrapati Sambhajinagar Gas Shortage: सेव्हन हिल येथील ऑटोगॅस सेंटरही गॅसअभावी बंद ठेवले आहे. ही परिस्थिती आणखीनच गंभीर होण्याची शक्यता आहे.

    छत्रपती संभाजीनगर(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर: आखातामध्ये चाललेल्या युद्धामुळे देशात इंधन संकट उभे राहिले आहे. शहरात एलजीपी गॅसवर चालणाऱ्या रिक्षा आणि इतर वाहनांमध्ये इंधन भरण्यासाठी असलेल्या ऑटो गॅस फ्युएल सेंटरवर ‘नो स्टॉक’चा बोर्ड लावण्यात आला आहे. शहरातील काही ऑटो गॅसचालकांनी ऑटो गॅसचा पुरवठा होत नसल्याने, गॅस सेंटरचालकाला त्यांचे सेंटर बंद ठेवण्याची वेळ आली आहे.

    शहरात एलपीजी इंधनावर चालणाऱ्या रिक्षांची संख्या वाढली आहे. पूर्वी पेट्रोल आणि डिझेलवर चालणाऱ्या रिक्षांच्या जागी आता पेट्रोल आणि एलपीजी या दोन्ही इंधनावर चालणाऱ्या रिक्षांची विक्री सुरू करण्यात आली. गेल्या काही वर्षांत अनेकांनी पेट्रोलवर चालणाऱ्या रिक्षांऐवजी एलपीजी आणि पेट्रोलवर चालणाऱ्या रिक्षा खरेदी केल्या. यामुळे शहरात विविध कंपन्यांचे ऑटोगॅस फ्युएल सेंटरचे आउटलेट सुरू झाले.

    Maharashtra Times‘लग्न करुन हिंदू मुलींना विकून टाकतात, मोहन भागवतांनी मांडलेली ‘तीन अपत्य’ ही भूमिका योग्यच’; Narendracharya Maharaj यांचे विधान
    इस्राईल- इराण आणि अमेरिका यांच्यात २८ फेब्रुवारी रोजी युद्ध सुरू झाले आहे. या युद्धामुळे हार्मुझ समुद्रधुनीतून मालवाहतूक इराणने राेखले आहे. आखाती देशांतील ऑइल निर्मिती बंद झाली आहे; तसेच गॅसचा पुरवठाही बंद झाला आहे. यामुळे देशात इंधनटंचाई निर्माण होत आहे. या इंधन टंचाईमुळे तीन दिवसांपूर्वी शहरातील १४ ऑटोगॅस फ्युएल सेंटरमधील सहा सेंटर बंद होती. मिलकॉर्नर येथील ऑटोगॅस सेंटरवरून गॅसची विक्री होत होती. शनिवारी गॅस पुरवठा वेळेत न झाल्याने, हे सेंटर बंद करण्यात आले.
    Maharashtra TimesCrime News : मुलगी नको, घरातच गर्भपाताचं रॅकेट, पोटच्या गोळ्याला पोटातच संपवलं, छ.संभाजीनगरमधील घटना उघड
    पर्यायी इंधनव्यवस्थेमुळे रिक्षाचालकांना आधार
    गेल्या काही दिवसांपासून शहरात एलपीजी रिक्षांना गॅस मिळणे कठीण होत चालले आहे. यानंतरही गॅस पंपावर रिक्षांच्या रांगा दिसत नाहीत. एलपीजी रिक्षा या पेट्रोलवरही चालतात. यामुळे एलपीजी इंधन न मिळाल्यास, संबंधित रिक्षाचालक रिक्षात पेट्रोल टाकून उदरनिर्वाह करीत आहेत.

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये ३ वर्षांपासून कन्सल्टंट म्हणून कार्यरत आहे.या आधी सकाळ मिडियामध्ये २ वर्ष कामाचा अनुभव आहे. चालू घडामोडी, गुन्हेगारी, राजकीय विषयांच्या बातम्यांत विशेष आवड.… आणखी वाचा