• Sat. Sep 21st, 2024

नाशिककरांनो लक्ष द्या! ‘या’ भागात शुक्रवारी पाणीपुरवठा बंद, कोणत्या परिसराला फटका? वाचा लिस्ट

नाशिककरांनो लक्ष द्या! ‘या’ भागात शुक्रवारी पाणीपुरवठा बंद, कोणत्या परिसराला फटका? वाचा लिस्ट

म. टा. विशेष प्रतिनिधी, नाशिक : सातपूर विभागातील प्रभाग क्रमांक ८ आणि १०, तसेच नाशिक पश्चिममधील ७ आणि १२ अशा चार प्रभागांमध्ये शुक्रवारी (दि. २३) सकाळी नऊपासून पाणीपुरवठा बंद राहणार आहे. शनिवारी (दि. २४)देखील कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. प्रभाग ११ मधील काही भागाचाही यात समावेश आहे.

सातपूरमधील प्रभाग नऊमधील कार्बन नाका व शिवाजीनगर येथील महापालिकेच्या श्री छत्रपती शिवाजी महाराज शाळेजवळील १२०० मिलिमीटर व्यासाच्या मुख्य जलवाहिनीची गळती बंद करण्यासाठी दुरुस्तीकाम करण्यात येणार आहे. त्यामुळे या चार प्रभागांमध्ये पाणीपुरवठा विस्कळीत होणार असून, नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने केले आहे.

…या भागात पाणीपुरवठा बंद

-प्रभाग ८ : सातपूरमधील बळवंतनगर जलकुंभ परिसर, सोमेश्वर कॉलनी, सुवर्णकारनगर, रामेश्वरनगर, बेंडकुळेनगर, पाटील पार्क परिसर, नवश्या गणपती परिसर, पाटील पार्क, आनंदवली, सावरकरनगर, पाइपलाइन रोड, काळेनगर, सद्गुरूनगर, खांदवेनगर, गणेश कॉलनी, सुयोग कॉलनी, कामगारनगर, गुलमोहर विहार, विवेकानंदनगर, निर्मल कॉलनी, शंकरनगर, चित्रांगण सोसायटी परिसर, मते नर्सरी रोड परिसर.

-प्रभाग १० : अशोकनगर, जाधव संकुल, समृद्धीनगर, वास्तुनगर, विवेकानंदनगर, पिंपळगाव बहुला गावठाण, राज्य कर्मचारी सोसायटी परिसर, सात माऊली, संभाजीनगर, राधाकृष्णनगर व इतर परिसर. प्रभाग ११ मधील बुद्धनगर व इतर परिसर.

CM शिंदेंकडून शिवरायांच्या शपथेचा अपमान, आम्हाला ५० टक्क्यांच्या आतच आरक्षण हवं : मराठा बांधव

-प्रभाग ७ : नाशिक पश्चिममधील नहुष जलकुंभ परिसर, नरसिंहनगर, पूर्णवादनगर, अरिहंत हॉस्पिटल परिसर, दातेनगर, अयोध्या कॉलनी, तेजोप्रभा, आनंदनगर, डी. के.नगर, शांतिनिकेतन सोसायटी परिसर, अयाचितनगर परिसर, चैतन्यनगर परिसर, सहदेवनगर परिसर, पंपिंग स्टेशन परिसर, चव्हाण कॉलनी, श्रमिक कॉलनी, माणिकनगर व इतर परिसर, सावरकरनगर, दातेनगर, रामनगर, उदय कॉलनी, नेर्लिकर हॉस्पिटल परिसर, जेहान सर्कल परिसर.
-प्रभाग १२ : रामराज्य जलकुंभ परिसर, यशवंत कॉलनी, कल्पनानगर, डिसुझा कॉलनी, कॉलजरोड व इतर परिसर, शिवगिरी सोसायटी, एसटी कॉलनी परिसर, शहीद चौक परिसर.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed