मध्य पूर्व आशियात आखाती देशांमध्ये सुरु असलेल्या युद्धाचा फटका आता थेट सर्वसामान्यांना बसताना दिसत आहे. अहिल्यानगर MIDC मध्ये तब्बल 300 उद्योग ठप्प झाल्याची माहिती आहे. यामुळे 3 हजार कामगारांचे रोजगार संकटात आला आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
अनिकेत यादव, अहिल्यानगर : आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाचे पडसाद आता स्थानिक उद्योगांवर उमटू लागले आहेत. इंडस्ट्रियल गॅसचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे अहिल्यानगर MIDC मधील तब्बल 300 उद्योगांचे चाके थांबले आहेत. त्यामुळे जवळपास 3 हजार कामगारांचे काम बंद पडण्याची शक्यता आहे, अशी प्रतिक्रिया आमी संघटनेचे अध्यक्ष जयद्रथ खकाळ यांनी दिली आहे. .गेल्या तीन दिवसांपासून गॅस उपलब्ध नसल्याने उत्पादन प्रक्रिया पूर्णपणे ठप्प झाली आहे. MIDC परिसरातील अनेक उद्योगांमध्ये उत्पादनासाठी इंडस्ट्रियल गॅस अत्यावश्यक असतो. विशेषतः इलेक्ट्रिकल मोटार निर्मिती करणाऱ्या कंपन्यांमध्ये गॅसवर आधारित प्रक्रिया मोठ्या प्रमाणावर केली जाते. मात्र गॅसचा पुरवठा खंडित झाल्याने मोटार तयार करण्याचे विभागच बंद पडले आहेत.
3 हजार कामगारांवर बेरोजगारीचे संकट ओढवले आहे
काही कंपन्यांमध्ये छोट्या प्रोजेक्टअंतर्गत सुमारे 700 मोटारी, तर मोठ्या कंपन्यांमध्ये 7 हजारांपर्यंत मोटारींचे उत्पादन केले जाते. पण गॅसच्या कमतरतेमुळे उत्पादन पूर्णपणे ठप्प झाल्याने उद्योगांना मोठा आर्थिक फटका बसत आहे. उद्योगांतील कामकाज थांबल्याने 3 हजार कामगारांवर बेरोजगारीचे संकट ओढवले आहे. ही परिस्थिती अशीच राहिली तर हजारो कामगारांच्या रोजगारावर गदा येण्याची शक्यता उद्योजकांनी व्यक्त केली आहे. परिस्थिती गंभीर होत असल्याने इंडस्ट्रियल गॅसचा पुरवठा तातडीने सुरळीत करावा, अशी मागणी MIDC मधील उद्योजकांनी सरकारकडे केली आहे. उद्योगांची चाके थांबल्याने आता प्रशासन काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
व्यावसायिक गॅस सिलेंडरचा तुटवडा; हॉटेल व्यवसाय बंद होण्याची शक्यता
व्यावसायिक गॅस सिलेंडर उपलब्ध नसल्याने शहरातील हॉटेल व्यवसायिकांपुढे मोठे संकट उभे राहिले आहे. सध्या काही हॉटेल्समध्ये स्टॉकमध्ये असलेल्या सिलेंडरवरच व्यवसाय सुरू आहे. मात्र येत्या दोन दिवसांत नवीन सिलेंडर उपलब्ध न झाल्यास अनेक हॉटेल्स बंद ठेवण्याची वेळ येऊ शकते. प्रशासनाकडून व्यावसायिक गॅस टाक्या उपलब्ध असल्याचा दावा केला जात असला तरी प्रत्यक्ष ग्राउंड लेव्हलवर हॉटेल व्यवसायासाठी लागणाऱ्या टाक्या मिळत नसल्याचे हॉटेल आणि बार असोसिएशनचे सचिव अविनाश मोरे यांनी सांगितले. त्यामुळे लवकरात लवकर गॅस टाक्यांचा पुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी हॉटेल व्यवसायिक अविनाश मोरे यांनी व्यक्त केली आहे.
गॅस तुटवड्याच्या अफवा, प्रशासनाचे स्पष्टीकरण
दरम्यान, जिल्ह्यात घरगुती गॅसचा कोणताही तुटवडा नसल्याचे जिल्हाधिकारी पंकज आशिया यांनी स्पष्ट केले आहे. नागरिकांनी गॅस टंचाईबाबत पसरवल्या जाणाऱ्या अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन त्यांनी केले. तसेच गॅस सिलेंडरची साठवणूक करून कृत्रिम टंचाई निर्माण करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशाराही प्रशासनाने दिला आहे.
लेखकाबद्दलचेतन पाटील“चेतन पाटील हे पत्रकार आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, मनोरंजन आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. चेतन पाटील यांनी दैनिक लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा विविध वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. चेतन हे जवळपास 8 वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी कल्याणच्या नामांकित बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी शिक्षण घेतलं आहे. त्यांना पदवीचं शिक्षण घेत असताना एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम करण्याचा अनुभव आहे. सध्या ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन येथे कार्यरत आहेत.
चेतन पाटील यांनी केलेल्या बातमीमुळे एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली. याशिवाय चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडलेला बघायला मिळाला आहे.
चेतन पाटील महाविद्यालयात शिक्षण घेत असताना त्यांच्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कवीकट्टा सदरात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांनी नाटकातही काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य हौशी स्पर्धेत भाग घेतलाय. त्यांनी ‘जलरंग तापी’ नाट्य संस्थेसोबत काम करत असताना ‘नटसम्राट’ नाटकात बूटपॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका प्रचंड भाव खाऊन गेली होती. त्यांच्या अभिनयाने प्रभावित होऊन एका प्रेक्षकाने त्यांना खांद्यावर उचलून घेत नृत्य केलं होतं.
खूप छोट्या गोष्टींमधून आनंद शोधावा, असं त्यांचं मत आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखनाची आवड आहे. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं वैयक्तिक आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.”… आणखी वाचा