Devendra Fadnavis: राज्य मंत्रिमंडळाच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत राज्यातील पाऊस, पिकांची स्थिती आणि उपलब्ध पाणीसाठ्याचा आढावा घेण्यात आला.
महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बैठकीनंतर माध्यमांना याबाबत माहिती दिली. ‘पावसाने खंड दिल्यामुळे अनेक भागांत जमिनीतील ओलावा कमी झाला असून, उभ्या पिकांना पाण्याची गरज निर्माण झाली आहे. त्यामुळे पावसाची मोठी तूट असलेल्या भागांची स्वतंत्र पाहणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सर्वेक्षणातून पिकांची नेमकी स्थिती स्पष्ट झाल्यानंतर नुकसान झालेल्या भागात मदतीची कार्यवाही केली जाणार आहे,’ असे त्यांनी सांगितले.
Uddhav Thackeray: पक्षचिन्हाचा गैरवापर नको, धनुष्यबाण चिन्ह तात्पुरते गोठवण्याची उद्धव ठाकरेंची मागणीपिकांना पाणी देता यावे, यासाठी दररोज १२ तास वीजसेवा देण्याचा आदेशही मुख्यमंत्र्यांनी दिला आहे. वीजपुरवठ्यात अडथळा ठरणारे जळालेले रोहित्र तातडीने बदलून शेतकऱ्यांना सुरळीत वीजपुरवठा करण्यास सांगण्यात आले आहे. ‘पावसाअभावी पिके वाचविणे शक्य असलेल्या भागांत सिंचनाचे नियोजन करण्यावर भर दिला जाणार आहे. मात्र, पिकांचे नुकसान झाले असल्यास सर्वेक्षण आणि पंचनाम्यांच्या आधारे नुकसानभरपाईची कार्यवाही केली जाईल,’ असे बावनकुळे यांनी स्पष्ट केले.
Kurla Ganesh Murti : बाप्पाच्या आगमनादरम्यान 15 फुटी गणेश मूर्ती कोसळली, कुर्ला येथील घटना, दोन जखमीउपलब्ध पाण्याचा वर्षभरासाठी आराखडा
पावसाच्या तुटीच्या पार्श्वभूमीवर उपलब्ध जलसाठ्याचा काटकसरीने वापर करण्याचा आदेशही दिला आहे. जलसंपदा विभागाच्या अखत्यारीतील जलसाठ्यांमध्ये किती पाणी आहे आणि त्याचा पुढील वर्षभरात कोणत्या पद्धतीने वापर करता येईल, याचे नियोजन करण्यास मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. पाऊस पुन्हा सुरू होऊन तूट भरून निघाल्यास परिस्थिती सुधारू शकते. मात्र, पावसाची स्थिती प्रतिकूल राहिल्यास उपलब्ध पाणी, सिंचन आणि पीकनुकसान यांचा आढावा घेऊन पुढील उपाययोजना करण्याचे संकेत सरकारने दिले आहेत.
