म. टा. प्रतिनिधी, पुणे: शहरातील वाहतूक, रस्त्यांवरील धूळ, बांधकाम प्रकल्प आणि औद्योगिक उत्सर्जनामुळे वायुप्रदूषणाचा सामना करणाऱ्या पुण्याने स्वच्छ हवेच्या राष्ट्रीय क्रमवारीत देशात बारावा क्रमांक पटकाविला आहे. केंद्र सरकारच्या ‘स्वच्छ वायू सर्वेक्षण २०२६’मध्ये (नॅशनल क्लीन एअर प्रोग्रॅम) दहा लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या शहरांच्या गटात पुण्याला २०० पैकी १८३ गुण मिळविले आहेत. या गटात ठाण्याने सातवे, नवी मुंबईने नववे आणि नागपूरने दहावे स्थान पटकावले आहे.
‘एनसीएपी’तर्फे हे सर्वेक्षण करण्यात आले. स्वच्छ वायू सर्वेक्षण २०२६ अंतर्गत वायुप्रदूषण नियंत्रणासाठी शहरांनी केलेल्या उपाययोजना, शहर कृती आराखड्याची अंमलबजावणी, रस्त्यावरील धूळ नियंत्रण, बांधकामांमधून होणारे प्रदूषण रोखण्यासाठी केलेले प्रयत्न, बांधकाम कचरा व्यवस्थापन , वाहन व औद्योगिक उत्सर्जनावरील नियंत्रण, कचरा व्यवस्थापन आणि जनजागृती अशा विविध निकषांवर शहरांचे मूल्यमापन करण्यात आले.
Pune News: पुण्यात धक्कादायक घटना; MBBS चं शिक्षण घेणाऱ्या २१ वर्षीय तरुणीने मृत्यूला कवटाळलंपुण्यासमोरील मुख्य आव्हाने वाढती वाहनसंख्या वाहतूक कोंडी मेट्रो व पायाभूत प्रकल्पांची बांधकामे रस्त्यांवरील धूळ बांधकाम साहित्याची वाहतूक काही भागांतील औद्योगिक उत्सर्जन सूक्ष्म धुलिकण (पीएम १०) आणि अतिसूक्ष्म धुलिकणांचे (पीएम २.५) प्रमाण कमी करणे
महाराष्ट्रातील मोठ्या शहरांची कामगिरी (१० लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या) ठाणे : ७वा क्रमांक – महाराष्ट्रात अव्वल नवी मुंबई : ९वा क्रमांक नागपूर: १० वा क्रमांक पुणे : १२वा क्रमांक मुंबई : २८वा क्रमांक नाशिकः २९वा क्रमांक
प्रभागस्तरावरील यश नाशिक महापालिका प्रभाग ७ : राष्ट्रीय क्रमवारीत ३रा पुणे महापालिका : प्रभाग क्रमांक ४ (खराडी-वाघोली) आणि प्रभाग क्रमांक ७ (गोखलेनगर, औंध) राज्यस्तरीय नोंद अमरावती : प्रभाग १२ उल्लेखनीय
Pune Crime : रुमचं भाडं थकलं, खाण्यापिण्याचा खर्च अन् अभ्यासाचा ताण; पैशांच्या अडचणीमुळे अधिकारी होण्यासाठी पुण्यात आलेल्या तरुणाचं टोकाचं पाऊलदेशातील अव्वल शहरे १. लखनौ : १९८ गुण २. इंदूर : १९७ गुण ३. जबलपूर : १९५ गुण
मध्यम शहरांची कामगिरी (३ ते १० लाख लोकसंख्या) अमरावती : ३रा क्रमांक महाराष्ट्रात सर्वोत्तम – लातूर : ७वा क्रमांक उल्हासनगर : १६वा क्रमांक सोलापूर : १७वा क्रमांक सांगली: २३वा क्रमांक जळगाव : २४वा क्रमांक अकोला : २६वा क्रमांक चंद्रपूर : ३०वा क्रमांक
लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर
किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.
पत्रकारितेतील अनुभव
किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.
शैक्षणिक पात्रता
किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.… आणखी वाचा