Sunetra Pawar Yugendra Pawar Someshwar Election: राज्यातील हा एकमेव सहकारी साखर कारखाना आहे, की जो सर्वाधिक ऊस दर शेतकऱ्यांना देत आहे. ही निवडणूक पॅनेल विरुद्ध पॅनेल अशी न राहता गावा-गावातील स्थानिक समीकरणांची परीक्षा ठरणार आहे.
युगेंद्र पवारांच्या पॅनेलने शेतकरी, तरुण आणि कारखान्याच्या भवितव्याचा मुद्दा पुढे केला आहे. दुसरीकडे सुनेत्रा पवारांच्या गटासमोर कारखान्यावरील विद्यमान प्रभाव कायम ठेवण्याचे आव्हान आहे. सुनेत्रा पवार यांनी यापूर्वी गावकी-भावकी, गट-तट बाजूला ठेवून एकत्र येण्याचे आवाहन केले आहे. मात्र युगेंद्र पवारांच्या स्वतंत्र पॅनेलच्या घोषणेमुळे निवडणूक आता प्रत्यक्ष लढतीकडे वळली आहे. युगेंद्र आणि सुनेत्रा पवार यांच्यात थेट मतविभाजन झाले, तर भाजप किंवा शिवतारे गटाला मिळणारी मते काही जागांवर निर्णायक ठरू शकतात. उलट विरोधकांची मते विभागली गेली आणि एका पॅनेलमागे स्थानिक नेते एकवटले, तर निकालाचे चित्र पूर्णपणे बदलणार आहे.
Clean Air Survey 2026: स्वच्छ हवेच्या शर्यतीत पुण्याची झेप; देशात 12वे, ठाणे महाराष्ट्रात अव्वल, मुंबई 28व्या क्रमांकावरकोणत्या गावात कोणत्या नेत्याचा शब्द चालतो, कोणत्या पॅनेलला स्थानिक कार्यकर्त्यांची ताकद मिळते आणि मतदानाच्या दिवशी मतदार प्रत्यक्षात कोणाच्या पारड्यात मत टाकतात, यावर विजयाचे गणित अवलंबून राहणार आहे. ११ ऑक्टोबरला मतदान आणि १२ ऑक्टोबरला मतमोजणी होत असल्याने निकालातून बारामतीच्या सहकारातील नव्या राजकीय समीकरणाची दिशा स्पष्ट होणार आहे. यापूर्वी लोकसभेच्या निवडणुकीत ‘पवार विरुद्ध पवार’ अशी थेट राजकीय लढत राज्यातील नागरिकांना पाहायला मिळाले होती.
Pune Crime : रुमचं भाडं थकलं, खाण्यापिण्याचा खर्च अन् अभ्यासाचा ताण; पैशांच्या अडचणीमुळे अधिकारी होण्यासाठी पुण्यात आलेल्या तरुणाचं टोकाचं पाऊलहा गट ठरणार निर्णायक…
कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील मांडकी-जवळार्जुन गटात ६,२४८, होळ-मोरगावमध्ये ५,५५६, निबुत-खंडाळामध्ये ५,५२४, कोराळे-सुपामध्ये ५,५०३ आणि मुरूम-वाल्हा गटात ४,७९५ मतदार आहेत. त्यामुळे मांडकी-जवळार्जुन हा सर्वाधिक मतदारांचा गट असून, या गटातील कौल निकालाची दिशा बदलू शकतो. कार्यक्षेत्रातील शेतकरी सभासद हे मतदान करून २१ लोकांच्या हातात हा कारखाना विश्वासाने देणार आहेत, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
