Mira Bhayandar News : पर्युषण पर्वात डब्यात कांदा-लसूण नको, मिरा रोडमधील भाजप नेत्याच्या शाळेचा विद्यार्थ्यांसाठी फतवा, मनसेचा कडाडून विरोध
पर्युषण पर्वाच्या काळात विद्यार्थ्यांनी शाळेत डब्यामध्ये कांदा-लसणाचे पदार्थ आणू नयेत, असे आवाहन करणारे पत्रक मिरा रोड येथील सेव्हन स्क्वेअर अॅकॅडमी शाळेकडून प्रसृत करण्यात आले आहे. या सूचनेला मनसेने तीव्र विरोध दर्शवला असून, विद्यार्थ्यांनी काय खावे आणि काय खाऊ नये, हे शाळेने ठरवणे चुकीचे असल्याचे मत व्यक्त केले आहे.