Shivsena Symbol Row: ‘एमपीएससी’च्या परीक्षांमधील कथित गैरप्रकार आणि पेपरफुटीच्या विरोधात सुरू असलेल्या आंदोलनाला ठाकरे यांनी पाठिंबा जाहीर केला.
चिन्ह आणि पक्षाच्या नावाचा कथित गैरवापर करून त्यांनी सत्ता मिळवली आणि त्यानंतर त्याचा गैरवापर झाला, अशी टीकाही त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव न घेता केली. उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी शिवसेना भवन येथे प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना डीजेचा वापर, एमपीएससी परीक्षांतील गोंधळ, मराठा आरक्षण या मुद्द्यांवरून सरकारवर टीका केली.
Kurla Ganesh Murti : बाप्पाच्या आगमनादरम्यान 15 फुटी गणेश मूर्ती कोसळली, कुर्ला येथील घटना, दोन जखमीउत्सव हे नागरिकांच्या आनंदासाठी असावेत. त्यातून नागरिकांना त्रास होता कामा नये. दणदणाटापेक्षा आरती, झांज आणि घंटानाद यांसारख्या पारंपरिक पद्धतींमध्येही उत्सवाचा आनंद मिळतो. त्यामुळे मोठ्या आवाजातील डीजे आणि ध्वनिप्रदूषणाचा आग्रह कशासाठी, असा प्रश्न करत ठाकरे यांनी ‘डीजे’बंदीबाबत बैठक घेऊन महाराष्ट्रासाठी एकसमान धोरण ठरवण्याची मागणी केली.
नगरसेवकांवर एकतर्फी कारवाई
मुंबई महापालिकेतील नगरसेवकांवर होत असलेल्या कारवाईवर उद्धव ठाकरे यांनी आक्षेप घेतला. आपल्या पक्षाच्या नगरसेवकांच्या प्रकरणांमध्ये वेगाने निर्णय होत असतील तर अन्य पक्षांच्या नगरसेवकांवरील आक्षेपांच्या प्रकरणांमध्येही त्याच पद्धतीने निर्णय व्हायला हवेत, अशी मागणी त्यांनी केली. निवडणुकीसाठी वापरलेली कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे एकाच व्यवस्थेतून मिळालेली असताना एका पक्षाच्या नगरसेवकांवरच वेगाने कारवाई होत असेल, तर ती एकतर्फी कारवाई असल्याचा आरोप ठाकरे यांनी यावेळी केला.
Ganeshotsav Toll Free : गणेशोत्सवाला कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी खुशखबर! राज्य सरकारकडून टोलमाफीची घोषणा, स्वतंत्र पासची व्यवस्थाफोटो वेगवेगळ्या भिंतींवर लावा
पंतप्रधानपदाच्या खुर्चीवर जे कोणी बसतील त्यांच्यासाठी राजशिष्टाचाराचा विषय असतो. आजपर्यंत अनेक जण बसून गेले आहेत. त्यावर आपले पंतप्रधान बसले आहेत. भविष्यात दुसरे कोणी बसणार आहेत. त्यामुळे राजशिष्टाचार आणि दैवतांचा फोटो वेगळा असला पाहिजे. दैवत कोणी बदलू शकत नाही. राजशिष्टाचाराप्रमाणे माणसे बदलू शकतात. पद मिळवण्यासाठी माणसे पक्ष बदलू शकतात. आम्ही दैवत बदलू शकत नाही. त्यामुळे दैवतांच्या बरोबर राजशिष्ठाचाराची मागणी नसावी. तुम्ही वेगळी भिंत ठेवा. सरकारी भिंतीवर सरकारी माणसे पाहिजेत, असे ते म्हणाले.
