मराठवाड्यातून पहिल्यांदाच कोकणासाठी रेल्वे चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विशेष म्हणजे नांदेड-सावंतवाडी विशेष रेल्वेची घोषणादेखील करण्यात आली आहे. कोकण फिरण्यासाठी जाणाऱ्या मराठवाड्यातील प्रवाशांसाठी ही चांगली सुविधा असणार आहे. तसेच मराठवाड्यात राहणाऱ्या कोकणी विद्यार्थी आणि नागरिकांनादेखील या रेल्वे सेवेचा मोठा लाभ होणार आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यातून पहिल्यांदाच नांदेडहून कोकणसाठी विशेष रेल्वे चालविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नांदेड-रत्नागिरी/सावंतवाडी ही विशेष रेल्वे चालविण्यात येणार आहे. ही विशेष रेल्वे परभणी, परळी, लातूर रोड मार्गे पुणे, सावंतवाडीकडे जाणार आहे. ही विशेष रेल्वे घोषित झाल्यामुळे मराठवाड्यात कोकण भागाशी संबंध असलेल्या प्रवाशांना लाभ मिळणार आहे. याशिवाय कोकण दर्शन करण्यासाठी जाण्याच्या इच्छुकांना या रेल्वेतून कोकणचे सौंदर्य पाहण्याचा लाभ मिळणार आहे.
गौरी गणपतीसाठी कोकण भागाकडे जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी विशेष बसची सुविधा उपलब्ध करून देण्यात येत असते. मराठवाड्यात कोकण भागातील अनेक नागरिक, विद्यार्थी आहेत. या नागरिकांसाठी नांदेड ते सावंतवाडी दरम्यान विशेष रेल्वे चालविण्याची मागणी मराठवाडा रेल्वे प्रवासी महासंघाकडून करण्यात आली.
या प्रवासी संघटनेकडून सिकंदराबाद, पुणे, मुंबई आणि कोकण विभागातील अधिकाऱ्यांना भेटून विशेष रेल्वे चालविण्याबाबत मागणी करण्यात आली. मराठवाडा रेल्वे प्रवासी महासंघाच्या मागणीला मराठवाडा रेल्वे प्रवासी महासंघ, कोकण रेल्वे विकास समिती यांच्यासह खासदार सुप्रिया सुळे, धाराशिवचे खासदार ओमप्रकाश निंबाळकर, लातूरचे खासदार शिवाजीराव कल्गे, नांदेडचे खासदार गोपछडे यांनी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव तसेच मध्य आणि दक्षिण-मध्य रेल्वे विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना पत्र लिहून विशेष रेल्वे सुरू करण्याची एकमुखी मागणी केली.
Amruta Fadnavis : दहीहंडीत स्त्रियांना वेडं-वाकडं नाचवाल तर ते योग्य नाही, अमृता फडणवीस यांची रोखठोक भूमिकामराठवाड्यातील नागरिकांची व लोकप्रतिनिधींची मागणी तसेच प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता, दक्षिण मध्य रेल्वेने नांदेड–सावंतवाडी रोड–नांदेड विशेष रेल्वेगाडी क्रमांक ०७६५९/ ०७६६० चालविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या रेल्वेच्या दोन्ही दिशेने दोन फेऱ्या होणार आहे.
अशी धावणार विशेष रेल्वे
रेल्वे क्रमांक ०७६५९ ही नांदेड-सावंतवाडी ही विशेष रेल्वे नांदेड येथून १२ आणि १४ सप्टेंबर (शनिवार आणि मंगळवार) या दोन्ही दिवशी रात्री ८ वाजता निघणार आहे. ही रेल्वे दुसऱ्या दिवशी पहाटे ३.३० ला सावंतवाडीरोड स्टेशनवर पोहोचणार आहे.
Ganeshotsav Toll Free : गणेशोत्सवाला कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी खुशखबर! राज्य सरकारकडून टोलमाफीची घोषणा, स्वतंत्र पासची व्यवस्थापरतीत रेल्वे क्रमांक ०७६६० ही सावंतवाडी रोड – नांदेड विशेष रेल्वे सावंतवाडी रोड येथून १४ आणि १७ सप्टेंबर रोजी (सोमवारी आणि गुरुवारी) सकाळी ७.३० वाजता सुटणार आहे. ही रेल्वे दुसऱ्या दिवशी नांदेड येथे सकाळी ११.३० वाजता पोहोचणार आहे. या रेल्वेत एकूण २४ कोचेस असणार आहे. यात वातानुकूलित द्वितीय श्रेणी, वातानुकूलित तृतीय श्रेणी, स्लीपर क्लास, सामान्य द्वितीय श्रेणी आणि एस. एल. आर. असे कोचेस देण्यात आले आहे.
Gautami Patil : गौतमी पाटील हिच्या अडचणी वाढवणारी मोठी बातमी, भाजप नगरसेविकेची पोलीस ठाण्यात तक्रार
या शहरातून जाणार विशेष रेल्वे
ही विशेष रेल्वेगाडी मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणातील अनेक महत्त्वाच्या शहरांना व पर्यटनस्थळांना जोडणार आहे. ही रेल्वे पूर्णा जं., परभणी जं., परळी वैजनाथ, लातूर रोड, लातूर, येडशी, बार्शी टाउन, कुर्डुवाडी, दौंड, पुणे, लोणावळा, कल्याण, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर, रत्नागिरी, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, कुडाळ येथे थांबणार आहे. या रेल्वेचा लाभ मराठवाड्यातील प्रवाशांना रत्नागिरी, चिपळूण, कणकवली, कुडाळ, सावंतवाडी यांसह कोकणातील विविध भागात जाण्यासाठी थेट रेल्वेसेवेचा लाभ मिळणार आहे.
लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.
डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.
चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.
चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.
महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.
चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.… आणखी वाचा