Ganeshotsav 2026 :गणेशोत्सवाला अवघ्या दोन दिवसांची प्रतीक्षा असताना मंडळांच्या बाप्पांचे आगमन अगदी वाजतगाजत होत आहे. ऐरोलीच्या राजाचे देखील आगमन झाले आहे. आणि गणेशमूर्ती आकर्षणाच कारण ठरत आहे.
गणेशमूर्ती मंडपात आणण्याचे काम सुरू
गणेशोत्सवाला काही दिवसच शिल्लक राहिल्याने मोठ्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकडून गणेशमूर्ती मंडपात आणण्याचे काम सुरू झाले आहे. ऐरोलीतील ‘ ऐरोलीचा राजा ’ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गणरायाचे नुकतेच जल्लोषात आगमन झाले. मंडळाच्या ३७व्या वर्षानिमित्त आयोजित या सोहळ्यात १२.५० फूट उंचीची मल्हारी मार्तंड रूपातील गणेशमूर्ती आकर्षणाचे केंद्र ठरली. हजारो गणेशभक्तांच्या उपस्थितीत ढोल-ताशांच्या गजरात गजाननाचे स्वागत करण्यात आले.
मंडपापर्यंत मिरवणूक
मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी भांडुप येथील कुंभार कार्यशाळेतून मूर्ती आणली. ऐरोली सेक्टर १५ येथील इच्छापूर्ती मंदिर परिसरात रात्री आठच्या सुमारास मूर्तीचे आगमन झाले. तेथून दुर्गामाता मंदिर आणि वरदविनायक मंदिर परिसरातील मंडपापर्यंत मिरवणूक काढण्यात आली. तरुणाईसह महिला आणि ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. पारंपरिक वेशभूषेत आलेल्या भाविकांमुळे सोहळ्याला रंगत आली.
तरुणाईचा उत्स्फूर्त सहभाग
प्रहार ढोल पथकाच्या ढोल-ताशांच्या गजराने परिसर दुमदुमून गेला. संगीताच्या तालावर तरुणाईने उत्स्फूर्त सहभागघेतला. मंडपात मूर्ती विराजमान करण्यापूर्वी ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते विधिवत पूजन करण्यात आले. त्यानंतर धार्मिक वातावरणात गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली.
FDA food safety : तुकाराम मुंढेंचा पुढाकार, आश्रमशाळा-हॉस्टेलना अन्नसुरक्षेचे धडे, पोषण आहाराबाबत FDA चा उपक्रम
स्वतंत्र परंपरा
नवी मुंबईत गेल्या काही वर्षांत गणेश आगमन सोहळ्याची स्वतंत्र परंपरा निर्माण झाली आहे. गणेशोत्सवाच्या काही दिवस आधीपासूनच सार्वजनिक मंडळांच्या मूर्तींचे आगमन सुरू होते. बेलापूर, नेरुळ, वाशी, सानपाडा, कोपरखैरणे, घणसोली, ऐरोली आदी भागांत विविध मंडळांकडून ढोल-ताशे, लेझीम आणि पारंपरिक वाद्यांच्या साथीने बाप्पाचे स्वागत केले जात आहे.
Jalgaon Crime : बैल पळवताना दुसऱ्याच्या बैलाला धडक, संतापात बापासमोर 18 वर्षीय लेकराला निर्घृणपणे संपवलं; पाटील कुटुंबावर शोककळा
मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित
त्यामुळे शहरातील वातावरण भक्तिमयझाले आहे. ऐरोलीतील आगमन सोहळ्याचे नियोजन मंडळाचे मार्गदर्शक नीलेश हांडे, रवी होसमानी, महंमद शेख, शिवा चौरसिया आणि रुपेश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. अध्यक्ष नीलेश हांडे यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
