• Fri. Sep 11th, 2026

मुंबई : २०१६ मध्ये मुंबईतील विलेपार्ले भागातील फिजिओथेरपिस्ट तरुणीवर अत्याचार करुन तिची हत्या केल्याप्रकरणी दोषी ठरवत फाशीची शिक्षा सुनावलेल्या एका व्यक्तीची सुटका करण्यात आली. यावेळी मुंबई उच्च न्यायालयाने सरकारी पक्षाच्या खटल्यातील त्रुटींवर बोट ठेवले.

सहा वर्ष जुने अत्याचाराचे प्रकरण

पीडित तरुणी आपल्या कुटुंबासोबत विलेपार्ले येथील एका चाळीत राहत होती. ती घरासमोरील एका स्वतंत्र माळ्यावरील खोलीत झोपत असे. ६ डिसेंबर २०१६ रोजी पहाटे ३ वाजताच्या सुमारास, बाहेरुन कडी लावलेल्या तिच्या खोलीतून धूर येत असल्याचे पाहून एका शेजाऱ्याने तिच्या पालकांना सावध केले. आग विझवल्यानंतर गळ्याभोवती जीन्स गुंडाळलेली अवस्थेत ती आढळून आली. तिच्या पालकांनी तिला खाली उतरवले. पोलिसांनी तिला रुग्णालयात नेले, तिथे तिला ‘मृत घोषित’ करण्यात आले.

शवविच्छेदन अहवालात नमूद केले होते की, पीडितेवर बळजबरीने लैंगिक अत्याचार करण्यात आले होते आणि तिचा मृत्यू गळा आवळल्यामुळे झाला होता. जवळच असलेल्या एका दागिन्यांच्या दुकानात काम करणाऱ्या व्यक्तीला जवळपास पावणे दोन महिन्यांनी, म्हणजे २८ जानेवारी २०१७ रोजी कोलकाता येथून अटक करण्यात आली होती.

Nashik News : समृद्धी महामार्गावरील अपघातात 21 वर्षांचा तेजस ब्रेन डेड, अनावर दुःखातही गायकवाडांचा मोठा निर्णय, मुंबईपर्यंत एअर ग्रीन कॉरिडोर

२०१९ मध्ये दोषी सिद्ध

१० ऑक्टोबर २०१९ रोजी, अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए. डी. देव यांनी त्याला अत्याचार, हत्या आणि अनैसर्गिक लैंगिक गुन्ह्यांसह अनेक आरोपांसाठी दोषी ठरवले. “अत्यंत मानसिक विकृती” दर्शवणारे हे “भयंकर, क्रूर किंवा घृणास्पद कृत्य” असल्याने हा गुन्हा “दुर्मिळातील दुर्मिळ” श्रेणीत मोडतो, असे न्यायालयाने निरीक्षण नोंदवले.

उच्च न्यायालयाने नमूद केले की, सत्र न्यायालयाने असा निष्कर्ष काढला होता की सरकारी पक्षाने त्याला गुन्ह्याशी जोडणारी परिस्थितीजन्य पुराव्यांची साखळी सिद्ध केली आहे. सरकारी वकील तनवीर खान यांनीम त्याच्या जीन्सवर आढळलेले रक्ताचे डाग आणि एका कंगव्याचे (जे पीडितेच्या नमुन्याशी जुळले होते) रासायनिक विश्लेषण/डीएनए अहवाल तसेच सीसीटीव्ही फुटेज यांवर आपला युक्तिवाद आधारला होता.

पीडितेच्या वडिलांचे वकील सिद्धार्थ जगुष्टे यांनी सांगितले की, डीएनए प्रोफाइलिंगमुळे ती व्यक्तीच आरोपी असल्याचे सिद्ध झाले. त्याचे वकील युग चौधरी यांनी असा युक्तिवाद केला की, उपलब्ध पुराव्यांवरुन त्याचा गुन्हा सिद्ध करण्यात सरकारी पक्ष अपयशी ठरला.

Maharashtra TimesBermuda Triangle : कुप्रसिद्ध बर्म्युडा ट्रँगलजवळ छोटं विमान बेपत्ता, आजी-आजोबांसह नातवंडांनी प्राण गमावले, निघताना केलेला मेसेज ठरला शेवटचा

खटल्यात त्रुटी असल्याचं निरीक्षण

संबंधित व्यक्तीवर “संशयाची सुई वळल्यापासूनच” न्यायाधीशांना सरकारी पक्षाच्या खटल्यात अनेक त्रुटी आढळल्या. सीसीटीव्ही फुटेजवरुन तो कोणाच्या घरात आणि कशासाठी डोकावत होता हे सिद्ध होत नसल्यामुळे, ही बाब त्याच्याविरुद्धचा पुरावा ठरू शकत नाही. हत्येनंतर दोन महिन्यांनी, जिथे तो राहत होता आणि आपल्या मालकासोबत काम करत होता, त्या खोलीतून त्याची जीन्स जप्त करण्यात आली होती. जीन्सवर बाहेरून रक्ताचे डाग आढळले नव्हते, तर ते उजव्या खिशाच्या आतल्या बाजूला आढळले होते; उच्च न्यायालयाने याला “एक नाविन्यपूर्ण कल्पना” (an innovative idea) असे म्हटले.

डीएनएवरुन प्रश्नचिन्ह

पंचनाम्यात कंगव्याच्या दांड्यावर लाल रंगाची नक्षी असल्याचे नमूद केले होते, तर रासायनिक विश्लेषकाने तो रक्ताचा डाग असल्याचे सांगितले होते. ओल्या चादरीवरुन मिळवलेले डीएनए सुरक्षित राहणे आणि त्याची संबंधिताच्या डीएनएशी तुलना करणे शक्य झाले, यावर न्यायाधीशांचा विश्वास बसला नाही. तसेच, त्याच्या डीएनए नमुन्याचे संकलन आणि जतन करण्याच्या पद्धतीवरही त्यांनी शंका उपस्थित केली.

Maharashtra TimesKanpur Murder : स्मार्ट दिसतोस रे.. लग्न नाही का केलं अजून? जुन्या नोकराला लाडीगोडी, घोळात घेऊन प्लॅन आखला, शालूची ‘धोखेबाजी’ उघडउच्च न्यायालयाने म्हटले की, सरकारी पक्षाचा खटला आरोपीच्या गुन्ह्याकडे निर्देश करणाऱ्या परिस्थितीजन्य पुराव्यांवर आधारित होता आणि हे पुरावे “निर्दोष असण्याच्या वाजवी शक्यतेशी विसंगत” होते. या सर्वांचा “एकूण परिणाम” म्हणून, संबंधित व्यक्तीची मुक्तता होणे न्यायोचित ठरले.

अनिश बेंद्रे

लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.

पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.

अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.

शैक्षणिक पात्रता
अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.… आणखी वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed