• Wed. Sep 9th, 2026

Kurla Ganesh Murti : बाप्पाच्या आगमनादरम्यान 15 फुटी गणेश मूर्ती कोसळली, कुर्ला येथील घटना, दोन जखमी

मुंबईत भुलेश्वरच्या राजाची मूर्ती कोसळल्याची घटना ताजी असताना आता तशाच घटनेची पुनरावृत्ती झाली आहे. सुदैवाने या दुर्घटनेत जीवितहानी झालेली नाही. कुर्ल्यात धारावीच्या दिशेला जाणाऱ्या गणपती बाप्पाच्या आगमनाच्या मिरवणुकीत 15 फुटी गणेश मूर्ती कोसळल्याची घटना घडली आहे. या घटनेत दोन जण किरकोळ जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे.

(फोटोमहाराष्ट्र टाइम्स)
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : भुलेश्वरचा राजाची मूर्ती कोसळून झालेल्या दुर्घटनेमुळे बसलेल्या धक्क्यातून मुंबईकर सावरत असताना मंगळवारी आणि एक गणेशमूर्ती दुर्घटनाग्रस्त झाली. धारावी येथील ओम शक्ती फाऊंडेशनची 15 फुटी गणेशमूर्ती कोसळली. यामध्ये कोणतीही जिवितहानी झाली नाही. मात्र दोन कार्यकर्ता जखमी झाल्याची माहीती पोलिसांनी दिली. दरम्यान या घटनेमुळे धारावी परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

नेमकं काय घडलं?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धारावी प्रेम नगर येथील ओम शक्ती फाऊंडेशनच्या राजाचे मंगळवारी आगमन होते. कुर्ला पश्चिमेकडील बैल बाजारमधून 15 फूट उंचीची गणेश मूर्ती धारावीकडे फाऊंडेशनचे कार्यकर्ते घेऊन जात होते. सायंकाळी शीतल तलावाजवळ गती रोधकावरून मूर्ती घेऊन जाणारी ट्रॉली कार्यकर्त्यांनी ओढली असता मूर्ती ट्रॉलीवरून उजव्या बाजूला कलंडली.

हा प्रकार वेळीच लक्षात आल्याने कार्यकर्ते मूर्तीपासून दूर गेले, मात्र दोन कार्यकर्ते जखमी झाला. किरकोळ जखमी झालेल्या या कार्यकर्त्यांवर भाभा रुग्णालयात उपचार करण्यात आले. संतोष जयस्वाल आणि रोहीत जयस्वाल असं जखमी कार्यकर्त्यांची नावे आहेत.

शीतल तलावात मूर्तीचे विधीवत विसर्जन

मूर्ती पडल्याची घटना समजताच विनोबा भावे नगर पोलीस तसेच परिसरातील नागरिक या ठिकाणी जमा झाले. मंडळाच्या कार्यकर्त्यांनी या सर्वांच्या मदतीने मूर्तीचे अवशेष गोळा केले आणि शीतल तलावात तिचे विधिवत विसर्जन केल्याची माहीती पोलीस उपायुक्त महेंद्र पंडीत यांनी दिली. दरम्यान, भुलेश्वर पाठोपाठ आणखी एक दुर्घटना घडलेल्या मूर्तीची उंची आणि बांधणी यावर प्रशचिन्ह उपस्थित केले जात आहेत.

भुलेश्वर राजाच्या आगमनावेळीही घडली होती दुर्घटना

काही दिवसांपूर्वी मुंबईत भुलेश्वर राजाच्या आगमनावेळीदेखील अशीच एक दुर्घटना घडली होती. या दुर्घटनेत मंडळाचे सचिव आणि कार्यकर्त्यांचा मृत्यू झाला होता. या दुर्घटनेमुळे मुंबईतील सार्वजनिक गणपतींच्या उंचीच्या मुद्द्यावरुन चर्चा झाली होती. संबंधित घटनेमुळे मोठी खळबळ उडाली होती. भुलेश्वरची घटना ही क्रेन आणि सपोर्ट सिस्टीममधील मुख्य वेल्डिंग अचानक तुटल्याने घडल्याची माहिती समोर आली होती. या घटनेनंतर सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात होती. यानंतर अशीच काहीशी घटना कुर्ल्यात घडली आहे.

चेतन पाटील

लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.

डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.

चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.

चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.

चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.

चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.

महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.

चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.… आणखी वाचा