• Fri. Sep 11th, 2026

Mumbai Crime: मुंबईतील जोगेश्वरी रेल्वे स्थानकावर विनातिकीट प्रवाशाने टीसीला मारहाण केल्याची घटना घडली आहे.

(फोटोमहाराष्ट्र टाइम्स)
मुंबई : रेल्वेचे तिकीट नाही, खिशात दंड भरण्याइतके पैसेही नाहीत; त्यामुळे कारवाई होऊ नये म्हणून पळ काढण्याचा प्रयत्न करणाऱ्या फुकट्या प्रवाशाला अडवले असता त्याने थेट टीसीवर हल्ला केल्याची धक्कादायक घटना जोगेश्वरी स्थानकात घडली. या हल्ल्यात जबर जखमी झालेल्या टीसीचा डोळा थोडक्यात बचावला. त्याच्या भुवईखाली सात टाके घालण्यात आले आहेत. या प्रकरणी आरोपी अजय धिवरला रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे.

जोगेश्वरी स्थानकाच्या फलाट क्रमांक ३/४च्या चर्चगेट दिशेकडील जिन्याजवळ बुधवारी सायंकाळी ४.५५च्या सुमारास हा प्रकार घडला. तिकीट तपासनीस आशिष गुप्ता दुपारी २ ते रात्री १० या वेळेत कर्तव्यावर होते. टीसी यांनी अजय धिवर याच्याकडे तिकीट-पासची मागणी केली. मात्र अजयने तिकीट नसल्याचे सांगितले. त्यामुळे टीसीने त्याला ५०० रुपयांचा दंड भरण्यास सांगितले. मात्र ‘माझ्याकडे पैसे नाहीत, केवळ १०० रुपये आहेत,’ असे सांगत त्याने दंड भरण्यास नकार दिला. त्यानंतर त्याला रेल्वे सुरक्षा दलाच्या (आरपीएफ) कार्यालयात नेण्यासाठी कर्मचारी पुढे निघाले. यावेळी संबंधित प्रवाशाने सोबत येण्यास नकार दिला.

जरांगे-शिंदेंविरोधात सदावर्तेंची तोफ धडाडली; राज ठाकरे, रोहित पवार यांनाही सुनावलं

गुप्ता यांनी त्याच्या खांद्यावर हात ठेवून त्याला आरपीएफ कार्यालयाकडे नेण्याचा प्रयत्न केला असता त्याने हात झटकून पळ काढण्याचा प्रयत्न केला. गुप्ता यांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न करताच प्रवाशाने जोरदार ठोसा मारला. हा ठोसा कर्मचाऱ्याने घातलेल्या चष्म्याच्या उजव्या बाजूला बसला. त्यामुळे चष्म्याची काच फुटून उजव्या भुवईखाली आणि डोळ्याखाली घुसली. जखमेतून रक्तस्राव सुरू झाला. या झटापटीत त्यांचा डोळा थोडक्यात बचावला. तरीही गुप्ता यांनी त्याला पकडले. त्यानंतर ड्युटीवर असलेल्या रेल्वे पोलिस आणि आरपीएफ कर्मचाऱ्यांच्या मदतीने त्याला आरपीएफ कार्यालयात आणण्यात आले.

Maharashtra TimesMaharashtra Rain Alert: पुढील चार दिवस पावसाचे! राज्यात वादळी पावसासह विजांचा कडकडाट, IMDचा अनेक जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’रेल्वे रुळांवर रील करणे महागात पडेल

रेल्वे रुळांवर रील तयार करणाऱ्यांनो सावधान! सोशल मीडियावर रेल्वे रुळावर अनधिकृतरित्या, रेल्वेच्या वाहतुकीसाठी अडथळा निर्माण करणे किंवा स्वत:चे जीव धोक्यात घालून रील तयार करताना रील क्रिएटर किंवा इन्फ्लुएन्सर आढळल्यास अशांवर रेल्वे सुरक्षा कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल केले जाणार आहेत. अशी माहिती दक्षिण मध्य रेल्वे विभागात कार्यरत रेल्वे सुरक्षा दलाकडून देण्यात आली आहे. रेल्वे सुरक्षा दलाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, सहा सप्टेंबर रोजी वाशिम रेल्वे स्टेशन परिसरात रेल्वे रुळावर एकाने रील बनवून सोशल मीडियावर व्हायरल केले. या रीलची दखल घेत रेल्वे सुरक्षा दलाचे पोलिस निरीक्षक सलीम शेख यांनी या प्रकरणात रील तयार करणाऱ्या अमोल यादव या २९ वर्षीय रील क्रिएटरला ताब्यात घेतले. या रिल क्रिएटरच्या विरोधात रेल्वे कायदा १९८९ च्या कलम १४७ व १४५ अन्वये भारतीय न्याय संहिताच्या कलम ३५ (३) अन्वये नोटीस बजाविण्यात आली आहे.

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

शैक्षणिक पात्रता
किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.… आणखी वाचा