FDA food safety :एफडीए विभाग राज्यात धडाकेबाज कामगिरी करत आहे. अशातच ‘एफडीए’ विभागाने ठाण्यात मार्गदर्शनाचा उपक्रम राबवला विशेष म्हणजे आदिवासी विकास विभागाच्या आश्रमशाळा आणि वसतिगृहांमध्ये हा उपक्रम राबण्यात आले.
विशेष उपक्रम
आदिवासी विकास विभागाच्या ठाणे अपर आयुक्त कार्यालयांतर्गत १२८ सरकारी आश्रमशाळा, ७३ अनुदानित आश्रमशाळा आणि ९० सरकारी वसतिगृहे येतात. या ठिकाणी विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या पोषण आहाराच्या सुरक्षिततेसाठी एफडीएकडून हा विशेष उपक्रम राबवण्यात आला.
एफडीएचे सहायक आयुक्त संतोष सिरोसिया यांचे मार्गदर्शन
विद्यार्थ्यांना मिळणारा पोषण आहार, तसेच कॅन्टीन आणि स्वयंपाकगृहातील खाद्यपदार्थांच्या सुरक्षिततेबाबत घ्यावयाच्या आवश्यक उपाययोजना आणि खबरदारी याविषयी एफडीएचे सहायक आयुक्त संतोष सिरोसिया यांनी मार्गदर्शन केले.
दूरदृश्य प्रणालीद्वारे सुमारे ५००
मुख्याध्यापक, अधीक्षक, अधीक्षिका आणि गृहपाल या सत्रात सहभागी झाले होते. एफडीएकडून नोंदणी व परवाना कसा घ्यावा, याबाबत माहिती देण्यात आली. यावेळी आदिवासी विकास विभागाचे अपर आयुक्त गोपीचंद कदम आणि सहायक आयुक्त राहुल शिर्के उपस्थित होते.
KDMC Hospital: ‘केडीएमसी’च्या १६ हजार चौरस फूट जागेतील रुग्णालयाची इमारत धूळ खात;नागरिकांची तक्रार
५०० लिटर दूध जप्त
डोंबिवली : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मावा आणि खवा बनविण्यासाठी विनाप्रक्रिया भेसळयुक्त दूध मोठ्या प्रमाणावर विक्रीसाठी आणल्याची माहिती मिळाल्यानंतर अन्न व औषध प्रशासनाने डोंबिवली पश्चिमेत कारवाई केली. या कारवाईत ५०० लिटरसुटे दूध जप्त करून नष्ट करण्यात आले. दुधातील भेसळीची तपासणी करण्यासाठी नमुने घेण्यात आले आहेत.
परवान्याशिवाय डोअरी चालू
डोंबिवली पश्चिमेकडील महात्मा फुले रोडनजीक भोईरवाडी येथील नवदुर्गा डोअरीमधून सुट्या दुधाची विक्री होत असल्याची तक्रार एफडीएकडे प्राप्त झाली होती.या तक्रारीच्या आधारे बुधवारी सकाळी अन्न व औषध प्रशासन विभागाचे अधिकारी महेंद्र कोडग आणि राजेंद्र कर्डक यांनी ही कारवाई केली. कारवाईदरम्यान रजपूत हे कोणत्याही परवान्याशिवाय डोअरी चालवत असल्याचे आढळून आले. तसेच विक्रीसाठी आणलेल्या दुधाची तपासणी केल्याचे पुरावे त्यांच्याकडे नव्हते , अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
