• Tue. Sep 8th, 2026

Amruta Fadnavis : दहीहंडीत स्त्रियांना वेडं-वाकडं नाचवाल तर ते योग्य नाही, अमृता फडणवीस यांची रोखठोक भूमिका

दहीहंडी कार्यक्रमांमध्ये डान्सर महिला आणि मुलींच्या नृत्यावर आता सर्वच स्तरावरुन टीका होत आहे. अमृता फडणवीस यांनीदेखील यावर प्रतिक्रिया दिली आहे. दहीहंडीत स्त्रियांना वेडं-वाकडं नाचवणं योग्य नसल्याची रोखठोक भूमिका अमृता फडणवीस यांनी मांडली आहे.

(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
चंद्रपूर : राज्यभरात नुकताच दहीहंडीचा कार्यक्रम पार पडला. मुंबई, ठाणे, पुणे, सातारा अशा वेगवेगळ्या शहरांमध्ये दहीहंडीचा कार्यक्रम पार पडला. अनेक कार्यक्रमांमध्ये अभिनेत्री, रिल्सस्टार आणि नृत्यांगणांनी हजेरी लावली. दहीहंडीच्या कार्यक्रमांच्या मंचावर या नृत्यांगणांनी नृत्य केलं. पण त्याला अनेकांकडून विरोध केला जातोय. पुण्यात डान्सर राधा पाटील हिच्याविरोधात गुन्हा दाखल झाल्याची घटना घडली आहे. तर ठाण्यात अश्लील हावभाव आणि डायलॉगचा आरोप करत भाजप नगरसेविका मृणाल पेंडसे यांनी डान्सर गौतमी पाटील हिच्याविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

मृणाल पेंडसे यांनी गौतमी पाटील हिच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. तसेच शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे अध्यक्ष संभाजी भिडे यांनी देखील यावरुन टीका केली आहे. दहीहंडीत बायका नाचवणारे देशद्रोही आहेत, असं संभाजी भिडे यांनी म्हटलं आहे. तर दहीहंडीतलं उत्तान नृत्य हिंदुत्ववाद्यांना मान्य आहे का? असा सवाल शिवसेना उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला आहे. या सर्व घडामोडींवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनीदेखील प्रतिक्रिया दिली आहे.

Maharashtra TimesGaneshotsav Toll Free : गणेशोत्सवाला कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी खुशखबर! राज्य सरकारकडून टोलमाफीची घोषणा, स्वतंत्र पासची व्यवस्था

अमृता फडणवीस काय म्हणाले?

“दहीहंडीसाठी तुम्ही स्त्रियांना मनोरा बनवण्यासाठी आवाहन केलं तर ही एकतेची गोष्ट आहे. पण तिथे स्त्रियांचा वेडं-वाकडं नाच करवाल तर ते मला वाटतं योग्य नाही. जिथे जे साजून छान दिसतं तेच करावं”, अशी भूमिका अमृता फडणवीस म्हणाल्या.

“दहीहंडीच्यावेळेस माणसं मनोरा बनवतात तसं स्त्रियांनादेखील मनोरा बनवायला सांगा. म्हणजे पावलावर पाऊल ठेवून चालवायला सांगा. तुम्ही त्यांना तसं नाचवता का? दहीहंडीला एक वेगळं महत्त्व आहे. ते महत्त्व आपण मेन्टेन केलं पाहिजे”, अशी भूमिका अमृता फडणवीस यांनी मांडली.

Maharashtra TimesGautami Patil : गौतमी पाटील हिच्या अडचणी वाढवणारी मोठी बातमी, भाजप नगरसेविकेची पोलीस ठाण्यात तक्रार

डीजेबंदीच्या मागणीवर अमृता फडणवीस काय म्हणाल्या?

“सुप्रीम कोर्टाने सण-उत्सवांच्यावेळी काही डेसिबलचा आवाज मान्य केला आहे. याबाबत आपल्याला जे निर्देश दिले गेले आहेत त्याचे आपण पालन केले पाहिजे म्हणजे आपल्या आसपासच्या लोकांना त्रास नको व्हायला. त्या धर्म ही खरी बाळायची गोष्ट आहे, आपल्याबरोबर मनात न्यायची गोष्ट आहे, त्यामुळे कोणत्याही धर्माचे असले तरी कुणालाही त्रास व्हायला नको”, असं अमृता फडणवीस म्हणाल्या आहेत.

Maharashtra TimesPM Modi : पंतप्रधानांच्या मुंबई दौऱ्याआधी कार्यक्रमस्थळावरुन दोन संशयित ताब्यात, एकाकडे सापडली बंदूक

गरबा खेळायला मुस्लीम व्यक्ती आल्यास परवानगी द्यावी का?

मंत्री नितेश राणे यांनी केलेल्या वक्तव्याबाबत अमृता फडणवीस यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी भूमिका मांडली. “आपला उत्सव हा सर्वसमावेश करतो. त्यामुळे मुस्लीम माणूस जर गरबा खेळायला येत असेल आणि नीट गरबाचा आनंद घेऊन जात असेल तर त्याल मला काही खराब वाटत नाही”, अशी भूमिका अमृता फडणवीस यांनी मांडली.