नाशिकच्या ‘त्या’ लाचखोर पोलिस कर्मचाऱ्याचे निलंबन, ‘एसीबी’नंतर आयुक्तालयाची कारवाई, काय प्रकरण?
म. टा. प्रतिनिधी, नाशिक : कॅफेत असलेल्या खोल्यांवरून कॅफे चालकाला धमकावून त्याच्याकडून प्रतिमहा अडीच हजार रुपयांचा ‘हफ्ता’ घेणारा सहायक उपनिरीक्षक संशयित शंकर गोसावी याच्यावर नाशिक शहर पोलिस आयुक्तालयाने कारवाई केली…
पाच हजारांची लाच पडली महागात, लाचखोर दुय्यम निबंधकाच्या घरी सापडली १ कोटी ३५ लाख रुपयांची रोख रक्कम
छत्रपती संभाजीनगर : शेतीचा दस्त तक्रारदार यांच्या पत्नीच्या नावे करण्यासाठी पाच हजाराची लाच मागणाऱ्या दुय्यम निबंधकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाच घेताना रंगेहात पकडले. अँटी करप्शन ब्युरो अधिकाऱ्यांनी निबंधकाच्या घरी झाडझडती…
Nashik Bribe: ग्रामपंचायत सदस्य लाच घेताना ACBच्या जाळ्यात, शाळा सुशोभीकरण निधीतून केली पैशांची मागणी
Nashik Bribe Case: १५ हजारांची लाच स्वीकारताना ग्रामपंचायत सदस्यास अटक करण्यात आली आहे. शाळा सुशोभीकरणाच्या कामात अडथळा न आणण्याच्या मोबदल्यात ही लाच घेतली.
छत्रपती संभाजीनगरात लाचखोरी दणक्यात! महिनाभरात ७ सापळे, १६ लाचखोर जाळ्यात
म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्रांतर्गत केलेल्या कारवायांमध्ये महिनाभरात सात सापळे रचण्यात आले. त्यामध्ये १६ लाचखोर अधिकारी-कर्मचारी आणि अन्य व्यक्तींविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले…
सुधाकर बडगुजरांना दिलासा मिळणार? मनी लॉंड्रिंगप्रकरणी आज जामिनावर सुनावणी
Sudhakar Badgujar : जिल्हा व सत्र न्यायालयात आज, शनिवारी सुधाकर बडगुजरांच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी होणार आहे. या अंतिम सुनावणीकडे दोन्ही पक्षांचे लक्ष आहे.
दोन हजारांसाठी मुकादम अडकला ACBच्या जाळ्यात, उल्हासनगर महापालिका कर्मचाऱ्यांची लाचखोरी पुन्हा एकदा उघड
म. टा. वृत्तसेवा, उल्हासनगर : दाटीवाटीचा भाग मोकळा आणि स्वच्छ करण्याची जबाबदारी असलेले प्रभाग मुकादम आर्थिक आमिषाला बळी पडत शहरात आणखी अनधिकृत फेरीवाल्यांना सामावून घेत असल्याचा प्रकार समोर येत आहे.…
भंडाऱ्यातील विस्तार अधिकारी ACBच्या जाळ्यात; ग्रामसेवकाकडून १० हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडलं
Bhandara Bribe Case: ग्रामसेवकाकडून लाच घेताना विस्तार अधिकाऱ्याला भंडारा लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे.
लाचखोरी काही थांबेना; राज्यात ७८६ सापळे, सर्वाधिक केसेस नाशिकमधील, काय सांगते २०२३मधील आकडेवारी?
म. टा. प्रतिनिधी, नाशिक : सन २०२३ मध्ये विविध शासकीय विभागांमध्ये झालेल्या लाचखोरीमुळे राज्यात ७८६ सापळे रचून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने एक हजार ९८ संशयितांवर गुन्हे नोंदविल्याची माहिती आहे. त्यापैकी सर्वाधिक…
जवळ होती निवृत्ती, पण सुटेना आसक्ती; इंजिनीअरला ४ लाख घेताना अटक; रात्रीच झाला ‘कार्यक्रम’
म. टा. प्रतिनिधी, नाशिक : चाळीसगाव तालुक्यातील पातोंडा येथील क्लस्टर विकासाचे चार कोटी आणि अतिरिक्त सुरक्षेची अनामत रक्कम ३५ लाख रुपये देण्याच्या मोबदल्यात चार लाख रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या उपविभागीय अभियंत्याला…
नागपूरच्या पुरवठा निरीक्षकासह दोघांना ACBचा दणका; शेतकऱ्याकडून लाच घेताना पकडले रंगेहाथ
म.टा. प्रतिनिधी, नागपूर : शेतजमीन अकृषक (एनए) असल्याच्या आदेशाची प्रत देण्यासाठी लाच घेणाऱ्या पुरवठा निरीक्षक व कनिष्ठ लिपिकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) गुरुवारी रंगेहाथ अटक केली. दुपारी २ वाजताच्या सुमारास…