• Sat. Sep 21st, 2024

पाच हजारांची लाच पडली महागात, लाचखोर दुय्यम निबंधकाच्या घरी सापडली १ कोटी ३५ लाख रुपयांची रोख रक्कम

पाच हजारांची लाच पडली महागात, लाचखोर दुय्यम निबंधकाच्या घरी सापडली १ कोटी ३५ लाख रुपयांची रोख रक्कम

छत्रपती संभाजीनगर : शेतीचा दस्त तक्रारदार यांच्या पत्नीच्या नावे करण्यासाठी पाच हजाराची लाच मागणाऱ्या दुय्यम निबंधकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाच घेताना रंगेहात पकडले. अँटी करप्शन ब्युरो अधिकाऱ्यांनी निबंधकाच्या घरी झाडझडती घेतले असता तब्बल एक कोटी ३५ लाख रुपयांची रोख रक्कम आढळून आली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या मोठ्या कारवाईमुळे जिल्ह्यामध्ये एकच खळबळ उडाली आहे.याप्रकरणी अधिक माहिती अशी की, छगन उत्तमराव पाटील (वय ४९ रा. छत्रपती संभाजीनगर) असे घरामध्ये रोख रक्कम आढळलेल्या नोंदणी कार्यालयातील लाचखोर कर्मचाऱ्याचे नाव आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यात असलेल्या नोंदणी विभागात दुय्यम निबंधक म्हणून छगन पाटील हे कार्यरत आहेत. सिल्लोड तालुक्यातील आमठाणा येथील तक्रारदार व त्यांची भावजय यांच्यामध्ये धावडा शिवारातील गट क्रमांक 47/१ मध्ये शेती आहे. या सामायिक शेतीचा दस्त तक्रारदाराच्या पत्नीच्या नावे करण्यासाठी अर्ज करण्यात आला होता. अर्ज केल्यानंतर नोंदणी विभागातील दुय्यम निबंधक छगन पाटील यांनी अर्जदाराला पाच हजार रुपयाची लाच मागितली. दरम्यान, ही माहिती तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे दिली. यावरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दुय्यम निबंधकाला सापळा रचून रंगेहात पकडले

देशाच्या समृद्धीसाठी जनता मोदींना साथ देणार, महाराष्ट्रात NDA ४५ पार होणार: मुख्यमंत्री शिंदे

सिल्लोड तालुक्यातील नोंदणी विभागात दुय्यम निबंधक म्हणून काम करणाऱ्या छगन पाटील यांना रंगेहात पकडण्यात आल्यानंतर अँटी करप्शन ब्युरोतर्फे छगन पाटील यांच्या घरावर तात्काळ छापेमारी करण्यात आली. अचानक केलेल्या कारवाईमध्ये तब्बल एक कोटी 35 लाख रुपयांची रोख रक्कम मिळून आली या प्रकरणी छगन पाटील यांना अटक करण्यात आली आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed