• Fri. Sep 11th, 2026

‘हर एक पल का शायर साहिर’ या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आज आयोजन – महासंवाद

ByMH LIVE NEWS

Mar 7, 2026
‘हर एक पल का शायर साहिर’ या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आज आयोजन – महासंवाद

मुंबई, दि. ७ : कवी गीतकार साहिर लुधियानवी यांच्या विविधांगी प्रतिभेचा समग्र धांडोळा घेणारा ‘हर एक पल का शायर साहिर’ या सांस्कृतिक कार्यक्रम आयोजन करण्यात आलेले आहे. हा कार्यक्रम शनिवार 7 मार्च, 2026 रोजी रात्री 8.30 वाजता प्रबोधनकार ठाकरे नाट्य मंदिर, बोरीवली येथे होणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग आणि सांस्कृतिक कार्य संचालनालय महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित केला आहे.

सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार व सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली हा सांस्कृतिक कार्यक्रम पार पडणार आहे. या कार्यक्रमात गायक म्हणून श्रीकांत नारायण, सरिता राजेश, सौम्या वर्मा आणि मुख्यार शाह यांचा सहभाग आहे. संगीत संयोजन प्रवीण फाटक यांनी केलेले असून या कार्यक्रमाचे निवेदन आरती शेट्टी व ध्वनीव्यवस्था नितीश फणसे करीत आहेत. हा कार्यक्रम रसिकांसाठी पूर्णपणे विनामूल्य असून रसिक प्रेक्षकांनी या सांस्कृतिक लोकप्रिय गीतांचा कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालक श्रीराम पांडे यांनी केले आहे.

०००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed