महायुतीच्या जागा वाटपात भाजप मोठा भाऊ
महायुतीच्या जागा वाटपाच्या चर्चेतील फॉर्म्युल्यानुसार भाजपला ३४ जागा मिळतील. गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपनं २५ जागा लढवल्या होत्या आता ते ९ जागा जास्त लढवतील. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे त्यांच्यासोबत १३ खासदार आहेत, त्यापैकी १० खासदार आहेत. अजित पवार यांच्यासोबत सुनील तटकरे हे एकमेव खासदार आहेत, त्यांना चार जागा मिळणार आहेत. यामध्ये बारामती, शिरुर आणि रायगड या जागांचा समावेश आहे. या जागेशिवाय अजित पवारांना कोणती जागा मिळणार हे पाहावं लागेल.
Read Latest Maharashtra News Updates And Marathi News
भाजपच्या दुसऱ्या यादीत महाराष्ट्रातील नावं
लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपासंदर्भातील वाद संपल्यानंतर भाजपच्या दुसऱ्या यादीत महाराष्ट्रातील उमेदवारांची नावं जाहीर होण्याची शक्यता आहे. भाजपनं पहिल्या यादीत १९५ उमेदवारांच्या नावांची घोषणा केली होती.
जागा वाटपाचा मार्ग मोकळं, अडचणी कायम
महाराष्ट्रात भाजपनं आतापर्यंत लोकसभेच्या सर्वाधिक २६ जागा लढवल्या होत्या. यावेळी भाजप ३४ जागांवर निवडणूक लढवणार आहे. महायुतीत भाजपला सर्वाधिक जागा मिळतील तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो. एकनाथ शिंदे यांच्यासोबत १३ खासदार आहेत. त्यापैकी तीन खासदारांचा पत्ता कट होणार आहे.
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला ४ जागा मिळू शकतात. बारामती, शिरुर, रायगड, परभणी या जागा राष्ट्रवादीला मिळतील. शिर्डी आणि यवतमाळ मध्ये उमेदवार बदलले जाऊ शकतात.