• Mon. Jun 15th, 2026

    Pune-Nagar Highway: देशातील सर्वात लांब उड्डाणपूल पुणे-नगर महामार्गावर, पुणे-शिरूर 31 किमी लांब रस्ता; प्रवासात वेळ वाचणार

    Pune-Nagar Highway: देशातील सर्वात लांब उड्डाणपूल पुणे-नगर महामार्गावर, पुणे-शिरूर 31 किमी लांब रस्ता; प्रवासात वेळ वाचणार

    Pune-Shirur Flyover: पुणे ते अहिल्यानगर राष्ट्रीय महामार्गावर देशातील सर्वात लांब उड्डाणपूल उभारण्यात येणार आहे. हा मार्ग पुणे ते शिरूर जोडणार असून 31 किमी लांब असणार आहे. याबद्दल केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी माहिती दिली आहे.

    पुणे: पुण्यातील वाहतूककोंडी सोडवण्यासाठी केंद्राकडून एकूण 45,000 कोटींचे रस्तेप्रकल्प मंजूर करण्यात आले आहेत. यामध्ये देशातील सर्वात लांब उड्डाणपुलाच्या योजनेचाही समावेश आहे. केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी याबद्दल माहिती दिली होती. यावेळी त्यांनी पुण्यात सुरू असेल्या अनेक प्रकल्पांचं काम पूर्ण करून चार महत्त्वाच्या रस्ते प्रकल्पांची सुरूवात करणार असल्याचीही माहिती दिली होती.

    कुठून-कुठे जोडणार?

    पुणे ते अहिल्यानगर महामार्गावर देशातील सर्वात मोठा उड्डाणपूल उभारण्याची योजना आहे. हा मार्ग पुणे – शिरूर तालुक्यापर्यंत बांधला जाणार आहे. पुणे-नगर महामार्गावर 53.4 किमी लांब उन्नत मार्ग विकसित केला जाणार आहे. या प्रकल्पासाठी 7,514 कोटी अपेक्षित आहे. या मार्गावर 31 किमी लांब उड्डाणपूल असणार आहे जो देशातील सर्वात लांब उड्डाणपूल असेल. हा उड्डाणपूल सहा पदरी असून खराडी जंक्शन ते रांजणगाव एमआयडीसीपर्यंत असणार आहे.Maharashtra TimesPune News: पुण्यात उभारला दुमजली उड्डाणपूल, पण पुलावरून जाताना वाहनचालक गोंधळात; विद्यापीठ चौकात पुन्हा कोंडी

    तिहेरी वाहतूक

    हा मार्ग दुमजली असून इथे तिहेरी वाहतूक शक्य होणार आहे. खराडी ते विठ्ठलवाडीपर्यंत 7.4 किमी लांब भागात खालील रस्त्यावर चौपदरी वाहतूक होणार आहे. त्यावरती पहिल्या टप्प्यावर वाहनांसाठी उड्डाणपूल आणि दुसऱ्या टप्प्यावर मेट्रो मार्गिका तयार केली जाणार आहे. पुणे ते शिरुर प्रवासासाठी सध्या दीड ते पावणे दोन तास लागतात. प्रवासाचा हा वेळ फक्त 45 मिनिटांवर येणार आहे. यानंतर या उन्नत मार्गाचा विस्तार करून त्याला शिरूर ते छत्रपती संभाजीनगरपर्यंत 192 किमी द्रुतगती मार्ग बनवणार आहे. या प्रक्लपासाठी 14,886 कोटींचा खर्च होणार असून पुणे ते संभाजीनगरचा प्रवास अवघ्या दोन तासांत होणार आहे.

    यावेळी नितीन गडगरींनी अनेक प्रकल्पांची घोषणा केली. यामध्ये तळेगाव ते चाकण उन्नत मार्ग, चाकण ते शिक्रापूर सहा पदरी मार्ग आणि पुणे-सोलापूर महामार्गावरील हडपसर ते यवत पट्ट्यात 31.50 किमी लांब मार्गांचा समावेश आहे.

    Maharashtra TimesPune News: पुण्याच्या अर्थसंकल्पात रस्त्यांसाठी 1500 कोटी, मिसिंग लिंक, उड्डाणपुलांसाठी तरतूद; दोन बोगदे लवकरच पूर्ण

    सध्या, 8 मार्च रोजी, पुण्यात आणखी एका दुमजली उड्डाणपुलाचं उद्घाटन झालं. सावित्रीबाई फुळे पुणे विद्यापीठ चौकासमोरील या उड्डाणपुलामुळे पुण्याती अनेक मार्गांवरील वाहतूककोंडी कमी होणार आहे अशी अपेक्षा आहे. पण मार्ग सुरू होऊन अनेक दिवस उलटून गेले असतानाही अद्याप मार्गावर वाहनचालकांसाठी दिशादर्शक फलक लागले नाहीत.

    सानिया कदम

    लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम, मटा ऑनलाईनमध्ये कन्सल्टंट पदावर कार्यरत आहे. प्रामुख्याने क्राइम, सिव्हिक आणि पॉलिटिक्स या बातम्या कव्हर करते. याआधी सहा महिने महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमध्ये कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून काम केले आहे. त्या काळात कॉलेज इव्हेंट्स, शैक्षणिक उपक्रम आणि सोशल मीडियावरील ट्रेंड्सवर बातम्या केल्या. मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून BMM मध्ये पदवी घेतल्यानंतर सध्या के.सी. महाविद्यालयात MA in Communication and Journalism करत आहे. इंटरनॅशनल घडामोडी आणि पॉप कल्चर हे विषय विशेष आवडीचे असून इंग्लिश आणि मराठी या दोन्ही भाषेत वाचन व लेखन करण्याची आवड आहे.… आणखी वाचा