• Sat. Sep 21st, 2024

अकोल्यात आंबेडकरांचे वर्चस्व; भाजप नेत्याच्या गावात वंचितचा झेंडा, प्रहारनं खातं उघडलं

अकोल्यात आंबेडकरांचे वर्चस्व; भाजप नेत्याच्या गावात वंचितचा झेंडा, प्रहारनं खातं उघडलं

अकोला : अकोला जिल्ह्यातील १४ ग्रामपंचायतीचे निकाल हाती आले आहेत. यामध्ये तेल्हारा तालुक्यातील बरुखेड येथील सरपंच बिनविरोध निवडून आले होते तर आज १३ जागांची मतमोजणी प्रक्रिया पार पडली. यामध्ये अकोला जिल्ह्यात प्रकाश आंबेडकरांचं वर्चस्व कायम राहीलं, म्हणजेचं इतर पक्षाच्या तुलनेत वंचित बहुजन आघाडीने सर्वाधिक जागा मिळवून आपलं वर्चस्व कायम ठेवले आहे. वंचित बहुजन आघाडीनं चार ग्रामपंचायतीमध्ये विजय मिळवलाय. तर काँग्रेस पक्षाने दोन तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटानं २ ग्रामपंचायतींवर सत्ता मिळवली. तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, भाजप, प्रहार जनशक्ती यांनी प्रत्येकी एक जागा काबिज केली आहे. यंदा प्रथमच प्रहार जनशक्ती पक्षाने अकोला जिल्ह्यात ग्रामपंचायतीमध्ये खाते उघडले आहे. तर इतर पक्षाने ३ जागा मिळवल्या आहेत. या निवडणुकीत शिंदे गट आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाला एकही जागा मिळवता आली नाहीये.

अकोला जिल्ह्यातील १३ सार्वत्रिक आणि ३८ ग्राम पंचायती अंतर्गत पोट निवडणुकीसाठी काल रविवारी मतदान झाले. एकूण २२६ उमेदवार रिंगणात होते. आज सोमवारी निकाल जाहीर करण्यात आले आहेत. सार्वत्रिक निवडणुकीसाठी ७६.९० टक्के तर पोटनिवडणुकीसाठी ६१.७९ टक्के मतदान झाले.

असा लागला अकोला जिल्हा ग्रामपंचायत निकाल :
एकूण ग्रामपंचायत : १४; अविरोध : ०१

अकोला तालुक्यात एकूण ४ ग्रामपंचायतीचा निकाल लागला असून यामध्ये कापशी ग्रामपंचायत वेणूताई उमाळे विजयी झाले आहे, ते भाजप प्रणित आहे. तर काटीपाटी ग्रामपंचायत पदी संगिता कासमपुरे निवडून आले असून ते वंचितचे आहे. एकलारा ग्रामपंचायतचा निकालात राजेश बेले हे विजयी झाले. ते स्थानिक आघाडीतून आहे. मारोडी ग्रामपंचयातवर देखील स्थानिक आघाडीनं बाजी मारली असून येथे पुजा वाघमारे विजयी झाले आहे.

भाजपच्या माजी गृह राज्यमंत्र्याच्या गावात वंचितच वर्चस्व

मुर्तीजापुर तालुक्यातील दोन ग्रामपंचायतचा निकाल हाती लागला असून यामध्ये भाजप नेते तथा माजी गृह राज्यमंत्री डॉ रणजीत पाटील यांच्या गाव घुंगशी ग्रामपंचायत वर वंचितनं बाजी मारली आहे. अनिल पाटील पवित्रकार हे वंचित प्रणित उमेदवार विजयी झाले आहे. तर गाजीपूर टाकळी ग्रामपंचायतवर देखील वंचितनं झेंडा फड़कवला आहे. मिना सचिन दिवनाले असं विजय झालेल्या उमेदवाराचे नाव आहे.

दरम्यान, पातूर तालुक्यात कोसगाव ग्रामपंचायतसाठी काल मतदान प्रक्रिया पार पडली असून आज निकाल हाती लागला आहे, या ग्रामपंचायतीसाठी गेल्या ३० वर्षात पहिल्यांदाच निवडणूक प्रक्रिया पार पडली आहे. यामध्ये रत्नमाला करवते हे विजयी झाले असून या ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीच्या अजित पवार गटानं बाजी मारली आहे.
सातारा ते पुणे रेल्वे प्रवास वेगवान होणार, विद्युतीकरणासह दुहेरीकरणबाबत मोठी अपडेट,प्रवासाचा वेळ वाचणार
बार्शीटाकळी तालुका :
एकूण ग्रामपंचायत : ०४
१) खोपडी : काँग्रेस
२) दोनद खुर्द : सागर कावरे : राष्ट्रवादी शरद पवार गट
३) खांबोरा : राष्ट्रवादी शरद पवार गट
४) जांभरून : काँग्रेस

तेल्हारा तालुका;
एकूण ग्रामपंचायत : ०३
१) बारूखेडा : श्यामलाल कासदेकर : अविरोध : वंचित
२) पिंपरखेड : गोपाल महारनर : प्रहार जनशक्ती पक्ष
३) झरीबाजार : जाहेरुन खातून : अन्य
————–
आधी कारखान्यात धोबीपछाड, आता ग्रामपंचायतीत झटका, विखेंच्या बालेकिल्ल्यात विवेक कोल्हेंची एन्ट्री

अकोला जिल्हा ग्रामपंचायत निवडणुक अंतिम निकाल

वंचित : ०४
काँग्रेस : ०२
अन्य : ०३
राष्ट्रवादी शरद पवार गट : ०२
भाजप : ०१
राष्ट्रवादी अजित पवार गट : ०१
प्रहार जनशक्ती पक्ष : ०१

एकूण ग्रामपंचायती : १४
निकाल जाहीर : १४
BAN vs SL: बांगलादेशच्या संघाचे लज्जास्पद कृत्य! आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अशी घटना कधीच घडली नाही

ग्रामपंचायत निवडणुकीत अजितदादांचा बोलबोला; बारामतीकर म्हणाले, ‘लोकसभेआधी पवार कुटुंब एकत्र येणार!’

Read Latest Maharashtra News And Marathi News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed