• Sat. Sep 21st, 2024
केसरकरांना धक्का, पवार काका-पुतण्या गटाला खातंही उघडता आलं नाही, सिंधुदुर्गात राणेच किंग!

सिंधुदुर्ग : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी गेल्या अनेक वर्षांपासून सिंधुदुर्ग जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य निवडणुकीत वर्चस्व कायम राखले. यंदाही हे चित्र पुन्हा पाहायला मिळालं. जिल्ह्यात एकूण २४ ग्रामपंचायतींपैकी भाजपने १६ ग्रामपंचायतींवर विजयी पताका फडकावली तर उद्धव ठाकरे गटाने ६ ग्रामपंचायती ताब्यात घेतल्या असून शिंदे गट, अजित पवार गट, कॉग्रेस, शरद पवार गटाला खातंही उघडता आलं नाही. ग्रामविकास पॅनलकडे २ ग्रामपंचायती आल्या आहेत.

जिल्ह्यातील २४ ग्रामपंचायतींपैकी शिंदे गट अर्थात दीपक केसरकर यांना जोरदार धक्का बसला असला. अजित पवार गट आणि शरद पवार गट यांनाही मोठा धक्का बसला आहे. ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये साधं खातंही खोलता आलेलं नाही. त्यामुळे या निवडणुकीची चर्चा जिल्हाभर सध्या सुरू आहे.

पवारांच्या काटेवाडीत भाजपची एन्ट्री, पण वर्चस्व अजितदादांचं, नेमकं काय घडलं?
जिल्ह्यातील २४ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी रविवारी शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली. २४ सरपंचपदासाठी ६४ तर ७६ सदस्यपदासाठी ३४२ उमेदवार रिंगणात होते. यासाठी ७१ मतदान केंद्रांवरून मतदान प्रक्रिया राबविण्यात आली. यासाठी सरासरी ६५ टक्के मतदान झाले, तर पोटनिवडणुकीसाठी एका सरपंचपदासाठी आणि ११ सदस्यपदांसाठी २२ उमेदवार रिंगणात होते. ७ केंद्रावर मतदान प्रक्रिया राबविण्यात आली. त्यासाठी ५८ टक्के मतदान झाले.

आधी कारखान्यात धोबीपछाड, आता ग्रामपंचायतीत झटका, विखेंच्या बालेकिल्ल्यात विवेक कोल्हेंची एन्ट्री
दोडामार्ग तालुक्यात मतदानासाठी मतदारांनी ग्रामपंचायतींच्या २४ सरपंच व १९२ सदस्यपदांसाठी सार्वत्रिक तर ५ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासाठी तर ४९ ग्रामपंचायतींच्या २४५ सदस्यपदांसाठी पोटनिवडणूक कार्यक्रम ६ ऑक्टोबरला निवडणूक आयोगाने जाहीर केली होती.

नितीन गडकरींना धक्का, गावच्या ग्रामपंचायतीत पराभव, काँग्रेसने १७ पैकी १० जागा जिंकल्या
सार्वत्रिक निवडणुकीत देवगड तालुक्यातील वळीवंडे, शिरवली, रामेश्वर, पावणाई, फणसगाव, विठ्ठलादेवी, वानिवडे, तिर्लोट, ठाकूरवाडी तर मालवण तालुक्यातील आचरा, वायंगणी, कणकवली तालुक्यातील ओटव, बेळणे खुर्द, एका दोडामार्ग तालुक्यातील साटेली- भेडशी, बोडण, कुडासे खुर्द, वेंगुर्ला तालुक्यातील पेंडुर, मातोंड, खानोलीत निवडणूक प्रक्रिया राबविण्यात आली होती. कुडाळ तालुक्यातील हुमरमाळा-अणाव, हुमरमाळा- वालावल, वालावल, भडगाव बुद्रुक, वर्दे या ग्रामपंचायतींसाठी देखील मतदान झालं. दोडामार्ग तालुक्यातील साटेली- भेडशी, बोडण, कुडासे खुर्द, वेंगुर्ला तालुक्यातील पेंडुर, मातोंड, खानोली प्रक्रिया मतदान प्रक्रिया राबविण्यात आली. यामध्ये कुडासे खुर्द ही एक ग्रामपंचायत पूर्णतः बिनविरोध झाल्याने उर्वरित दोन ग्रामपंचायतींसाठी मतदानाची प्रक्रिया पार पडली होती. त्यानंतर आज ग्रामपंचायतीचे निकाल हाती आले. या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमुळे जिल्ह्यातील अनेक दिग्गज नेत्यांना धक्का बसलाय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed