• Mon. Sep 21st, 2026
Sunetra Pawar यांच्यावर माळेगाव कारखान्यात नवी जबाबदारी, बिनविरोध निवडीतून अध्यक्षपदाची धुरा

Produced by: कोमल आचरेकर|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

राज्याच्या राजकीय आणि सहकार क्षेत्राचे लक्ष लागून राहिलेल्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदाचा पेच अखेर सुटला आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची आज कारखान्याच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली. या निवडीमुळे बारामतीच्या सहकार वर्तुळात सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले असून, कारखान्याच्या आगामी विकासकामांना गती मिळण्याचे संकेत आहेत.माळेगाव कारखान्याच्या अध्यक्षपदासाठी १२ मार्च रोजी विशेष निवडणूक प्रक्रिया पार पडली. बारामतीचे प्रांताधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी वैभव नावडकर यांनी या निवडीची अधिकृत घोषणा केली. दुपारी कारखान्याच्या मुख्य कार्यालयात संचालक मंडळाची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत अध्यक्षपदासाठी सुनेत्रा पवार यांचा एकमेव अर्ज दाखल झाला. इतर कोणताही उमेदवारी अर्ज न आल्याने ही निवड बिनविरोध झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी जाहीर केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed