• Fri. Mar 13th, 2026

    राज्य आपत्ती व्यवस्थापन दल प्रशिक्षण केंद्र कोयनानगर येथे स्थापण्याचा प्रस्ताव गृह विभागाने तयार करावा – मंत्री शंभूराज देसाई

    ByMH LIVE NEWS

    Nov 6, 2023
    राज्य आपत्ती व्यवस्थापन दल प्रशिक्षण केंद्र कोयनानगर येथे स्थापण्याचा प्रस्ताव गृह विभागाने तयार करावा – मंत्री शंभूराज देसाई

    मुंबई, दि.6 : सातारा जिल्ह्यातील कोयनानगर येथे राज्य आपत्ती व्यवस्थापन दल प्रशिक्षण केंद्र निर्मितीचा प्रस्ताव गृह विभागाने तातडीने सादर करावा, असे निर्देश राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.

    कोयनानगर येथे नियोजित असलेल्या राज्य आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण दल, पोलीस प्रशिक्षण उपकेंद्राच्या सद्यस्थितीचा आढावा बैठक आज मंत्रालयात मंत्री श्री. देसाई यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यावेळी ते बोलत होते.

    मंत्री श्री. देसाई म्हणाले की, कोयनानगर येथे नियोजित असलेल्या राज्य आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण दल व पोलीस प्रशिक्षण उपकेंद्रासाठी जागा मिळाली आहे. यामध्ये खेळाचे मैदान, कवायत मैदान, निवासी बांधकाम, प्रशासकीय इमारत यासाठी आवश्यक आराखडा तयार करण्यात यावा.

    या बैठकीस विशेष पोलिस महानिरीक्षक अशोक मोराळे (राज्य राखीव पोलीस बल, पुणे) गृह विभागाचे सहसचिव अ. ए. कुलकर्णी, वित्त विभागाचे सहसचिव विवेक दहीफळे, सहायक पोलिस महानिरीक्षक विजय खरात उपस्थित होते.

    ००००

    शैलजा पाटील/विसंअ

    मुंबई महानगर परिसरातील नामांकित खासगी रुग्णालयांनी एकत्रित आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेत सहभाग घ्यावा – सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर – महासंवाद
    ‘डायट’च्या माध्यमातून शिक्षणात अग्रेसर राहण्यासाठी प्रयत्न करा- शिक्षणमंत्री दादाजी भुसे – महासंवाद
    आगामी वर्षात सीपीआरमध्ये अत्याधुनिक उपचार पद्धती राबवणार – वैद्यकीय मंत्री हसन मुश्रीफ – महासंवाद

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed