• Sat. Mar 14th, 2026
    विधान भवन बॉम्बने उडवून देऊ, धमकी कुणी दिली? अधिवेशनात उडालेल्या खळबळीची A to Z स्टोरी

    Produced by: कोमल आचरेकर|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    आज १२ मार्च, सकाळी सर्व काही सुरळीत सुरू असताना अचानक आलेल्या इमेलनं मुंबई हाय अलर्टवर गेली. सध्या राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. यातच मुंबईतील विधानभवन बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाल्याने एकच खळबळ उडाली. या घटनेनंतर पोलीस आणि सुरक्षा यंत्रणांनी संपूर्ण विधान भवन परिसराचा ताबा घेतला आहे. केवळ विधानसभा नाही, तर बॉम्बे स्टॉक एक्सचेंज, मुंबई उच्च न्यायालय, मेट्रो यांबाबतही धमकीचा मेल आला. विधिमंडळाचे कामकाज सुरू असल्याने विधान भवन परिसरात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासह इतर मंत्री, आमदार आणि अधिकाऱ्यांची मोठी गर्दी असते. अशा वेळी मिळालेल्या या धमकीमुळे विधान भवनाची सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे. आज सकाळी विधानभवनात नेमकं काय घडलं तेच या व्हिडिओतून समजून घेऊ

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed