कोल्हापूर: कोल्हापुरात पंचगंगा नदीमध्ये गणेश मूर्ती विसर्जन करण्यावरून वाद सुरू आहेत. नदी प्रदूषित होऊ नये यासाठी महापालिकेने कोल्हापूरकरांना घरगुती गणपतीचे विसर्जन महापालिकेने दिलेल्या विसर्जन कुंडात करावं असं आवाहन केलंय. तर, हिंदुत्ववादी संघटनांनी याला विरोध करत घरगुती बाप्पांचं विसर्जन हे नदीतचा करण्याचा पवित्रा घेतलेला आहे. विसर्जनाचा हा वाद सुरू असतानाच दुसऱ्या बाजूला कोल्हापुरातील श्रीधर बाखरे यांनी आपल्या लाडक्या बाप्पाचं घरातच विसर्जन करून एक नवा आदर्श कोल्हापूरकरांना घालून दिलेला आहे. पंचगंगा नदीमध्ये अनेक ओढे – नाले मिसळत असल्याने नदी कायमस्वरूपी दूषित झालेली आहे. त्यामुळे दूषित पाण्यात आपल्या लाडक्या बाप्पाचे विसर्जन होऊ नये यासाठी बाखरे कुटुंबीयांनी गेल्या २५ वर्षाहून अधिक काळापासून आपल्या लाडक्या बाप्पाचे विसर्जन घरातच करण्यास सुरुवात केलेली आहे.
कोल्हापुरातील शुक्रवार पेठ येथे राहणारे श्रीधर बाखरे हे पुजारी असून ते घरोघरी जाऊन पूजा करत असतात.गेल्या कित्येक वर्षापासून ते रोज सकाळी पंचगंगा नदीवर जाऊन स्नान करत असतात. मात्र गेल्या काही वर्षापूर्वी या नदीत नाले मिसळले गेले यानंतर त्यांनी आपला गणपती बाप्पा विसर्जन हे घरातच करायचा असं त्यांनी ठरवलं आणि त्यानुसार गेल्या २५ वर्षाहून अधिक काळापासून ते घरातच आपल्या गणपती बाप्पाचा विसर्जन करतात. या सर्वात विशेष म्हणजे त्यांची मूर्ती ही दरवर्षी शाडूचीच असते. शिवाय ही मूर्ती ही दरवर्षी एकाच माती पासून बनवत असतात.
राहुल गांधींकडून अदानी आरोपीच्या पिंजऱ्यात, शरद पवार थेट गौतमभाईंच्या अहमदाबादच्या घरी!
गेल्या २५ ते ३० वर्षांपूर्वी त्यांनी सुरू केलेला हा उपक्रम आज सर्वजण अवलंबत असून त्यांचा आदर्श घेऊन तब्बल १२ जण आपली मूर्ती घरातच विसर्जन करून ती माती कारागीरांना देतात. आणि कुंभार त्याच मातीची मूर्ती करून त्यांना देतात.यामुळे पर्यावरण देखील रक्षण होतं आणि परंपरा आणि पवित्र्यात ही जपली जाते असे बाखरे कुटुंब आणि मूर्ती तयार करणारे कारागीर गिरीश बावडेकर म्हणतात.
यवतमाळहून बस नागपूरमध्ये, पाणी बसमध्ये घुसलं, २५ प्रवाशांचा जीव टांगणीला,अखेर SDRF कडून सुटका, दीड तास थरार
दरम्यान, दरवर्षी पर्यावरणपूरक पद्धतीनं गणेश मूर्ती दान करणाऱ्यांची आणि घरगुती व्यवस्था तयार करुन विसर्जन करणाऱ्यांची संख्या वाढत आहे.
पोलिसांशी हुज्जत, बॅरिकेड्स तोडले, हिंदुत्ववाद्यांकडून नियम पायदळी, पंचगंगेतच गणपतीचं विसर्जन