• Thu. Mar 19th, 2026
    Ahilyanagar MIDC : अहिल्यानगरच्या 20 हजार कर्मचाऱ्यांना दिलासा, PNG गॅसमुळे 300 कारखाने सुरु होणार

    अहिल्यानगर MIDC मधील कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. प्रशासनाकडून MIDC मधील कंपन्यांना आता PNG गॅस दिला जाणार आहे. त्यामुळे 300 कारखाने सुरु होणार आहेत. यामुळे 20 हजार कर्मचाऱ्यांना थेट फायदा होणार आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    अहिल्यानगर : आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे निर्माण झालेल्या इंडस्ट्रियल गॅसच्या तुटवड्यामुळे चार दिवस ठप्प पडलेल्या अहिल्यानगर MIDC मधील उद्योगांना अखेर मोठा दिलासा मिळाला आहे. भारत पेट्रोलियमकडून PNG (पाइपद्वारे नैसर्गिक वायू) गॅसचा पुरवठा करण्याचा निर्णय झाल्याने बंद पडलेले सुमारे 300 उद्योग पुन्हा सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे 20 ते 25 हजार कामगारांच्या रोजगारावर आलेले संकटही टळले आहे.

    अहिल्यानगर हजारो कामगारांवर बेरोजगारीची वेळ येण्याची भीती निर्माण झाली होती. जिल्हाधिकारी आणि MIDC मधील उद्योजक यांच्यात झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. औद्योगिक वापरासाठी लागणाऱ्या गॅसचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे इलेक्ट्रिकल मोटर तसेच विविध इलेक्ट्रिकल वस्तू तयार करणारे अनेक कारखाने गेल्या चार दिवसांपासून पूर्णपणे बंद होते. यामुळे हजारो कामगारांवर बेरोजगारीची वेळ येण्याची भीती निर्माण झाली होती.

    दरम्यान, भारत पेट्रोलियमची PNG गॅस पाईपलाईन MIDC परिसरात आधीच उपलब्ध असली तरी आतापर्यंत काही मोजक्याच कारखान्यांना या गॅसचा पुरवठा होत होता. मात्र सध्या कंपनीकडे उपलब्ध असलेल्या गॅस साठ्याच्या आधारे उर्वरित उद्योगांनाही PNG गॅस देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.

    कारखान्यांचे चाक पुन्हा फिरणार असल्याने सुमारे 300 उद्योजक आणि 20 ते 25 हजार कामगारांना मोठा दिलासा मिळाला आहे. औद्योगिक आणि व्यावसायिक वापरासाठीच्या LPG आणि CNG गॅसवर काही प्रमाणात निर्बंध लागू असताना PNG गॅसवर अशी बंधने नसल्याने MIDC मधील उद्योगांसाठी हा पर्याय अत्यंत महत्त्वाचा ठरला आहे. प्रशासनाच्या या निर्णयामुळे येत्या आठवडाभरात PNG गॅसचा पुरवठा सुरू होऊन MIDC मधील उत्पादन पुन्हा पूर्ववत होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

    गेल्या चार दिवसांपासून बंद असलेल्या कारखान्यांचे चाक पुन्हा फिरणार असल्याने सुमारे 300 उद्योजक आणि 20 ते 25 हजार कामगारांना मोठा दिलासा मिळाला आहे. उद्योगधंद्यांचे भट्टे पुन्हा पेटणार असल्याने MIDC परिसरात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटील“चेतन पाटील हे पत्रकार आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, मनोरंजन आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. चेतन पाटील यांनी दैनिक लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा विविध वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. चेतन हे जवळपास 8 वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी कल्याणच्या नामांकित बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी शिक्षण घेतलं आहे. त्यांना पदवीचं शिक्षण घेत असताना एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम करण्याचा अनुभव आहे. सध्या ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन येथे कार्यरत आहेत.

    चेतन पाटील यांनी केलेल्या बातमीमुळे एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली. याशिवाय चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडलेला बघायला मिळाला आहे.

    चेतन पाटील महाविद्यालयात शिक्षण घेत असताना त्यांच्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कवीकट्टा सदरात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांनी नाटकातही काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य हौशी स्पर्धेत भाग घेतलाय. त्यांनी ‘जलरंग तापी’ नाट्य संस्थेसोबत काम करत असताना ‘नटसम्राट’ नाटकात बूटपॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका प्रचंड भाव खाऊन गेली होती. त्यांच्या अभिनयाने प्रभावित होऊन एका प्रेक्षकाने त्यांना खांद्यावर उचलून घेत नृत्य केलं होतं.

    खूप छोट्या गोष्टींमधून आनंद शोधावा, असं त्यांचं मत आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखनाची आवड आहे. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं वैयक्तिक आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.”… आणखी वाचा