• Sun. Sep 22nd, 2024

गणेशोत्सवानिमित्त नाशिकमधील वाहतुकीत मोठे बदल; या रस्त्यांवर नो एंट्री, पर्यायी मार्ग कोणते?

गणेशोत्सवानिमित्त नाशिकमधील वाहतुकीत मोठे बदल; या रस्त्यांवर नो एंट्री, पर्यायी मार्ग कोणते?

नाशिक : शहरातील सार्वजनिक गणेशोत्सवासाठी पोलिस आयुक्तालयाने ८०५ मंडळांना सशर्त परवानगी दिली आहे. यासह शहराच्या मध्यवर्ती भागात मंडळांचे देखावे पाहण्यासह मंडळांच्या मानाच्या गणेशदर्शनासाठी भक्तांची गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे गणेशोत्सवात वाहतूक पोलिसांनी रोज सायंकाळी ६ ते रात्री १२ पर्यंत शहरातील प्रमुख रस्त्यांवरील वाहतूकमार्गात बदल केले आहेत. त्यामुळे गणेशभक्तांनी दर्शनासाठी घरातून निघण्यापूर्वी हे बदल विचारात घ्यावेत, अशी सूचना पोलिसांनी केली आहे.

या रस्त्यांवर ‘नो एंट्री’

– सारडा सर्कल-गंजमाळ-शालिमारमार्गे सीबीएसकडे
– शालिमारकडून नेहरू गार्डनमार्गे गाडगे महाराज पुतळा व मेन रोडकडे
– त्र्यंबक नाका पोलिस चौकीकडून बाहशाही कॉर्नरकडे दोन्ही बाजूने
– सीबीएसकडून शालिमार व नेहरू गार्डनकडे
– सीबीएसकडून कान्हेरेवाडी व कालिदास कलामंदिराकडे दोन्ही बाजूने
– मेहेर सिग्नलकडून सांगली बँक सिग्नल, धुमाळ पॉइंटमार्गे दहीपूल दोन्ही बाजूने
– अशोक स्तंभाकडून रविवार कारंजा व मालेगाव स्टँडकडे दोन्ही बाजूने
– मालेगाव स्टँड-रविवार कारंजामार्गे सांगली बँक सिग्नल दोन्ही बाजूने
– सरदार चौक ते काळाराम मंदिरापर्यंत दोन्ही बाजूने
– मालवीय चौक, गजानन चौक, नाग चौक ते शिवाजी चौक दोन्ही बाजूने

पर्यायी मार्ग

– सारडा सर्कलवरून गडकरी चौकमार्गे त्र्यंबक नाका, सीबीएस, मेहेर, अशोकस्तंभ, रामवाडीमार्गे पेठरोड व दिंडोरी नाक्याकडे
– मालेगाव स्टँडकडून मखमलाबाद नाका, रामवाडीमार्गे जुना गंगापूर नाका सिग्नलवरून इतरत्र

सिटी लिंकचा मार्ग

– निमाणी बसस्थानकापासून शालिमारमार्गे नाशिकरोड जाणाऱ्या बस मालेगाव स्टँड- रामवाडी- जुना गंगापूर नाका- शरणपूर सिग्नल- त्र्यंबक नाका सिग्नल- गडकरी चौकातून सारडा सर्कलमार्गे जातील.
– नाशिकरोडकडून येणाऱ्या बस सारडा सर्कलवरून गडकरी चौक- त्र्यंबक नाका- सीबीएस- मेहेर- अशोकस्तंभ- रामवाडी- मखमलाबाद नाका- पेठनाकामार्गे निमाणी बसस्थानकात जातील.

पाच व सात दिवसांच्या गणेश विसर्जनावेळी (२३ व २५ सप्टेंबर)

– निमाणी बस स्थानकावरून पंचवटी कारंजा- मालेगाव स्टँड- रविवार कारंजा मार्गावरून बस जाणार नाहीत. मोठ्या वाहनांनादेखील दुपारी २ ते रात्री १२ पर्यंत प्रवेश बंद असेल.
– सीबीएसकडून पंचवटीकडे जाणाऱ्या बस व मोठ्या वाहनांना अशोकस्तंभ- रविवार कारंजामार्गे पंचवटी कारंजाकडे जाणाऱ्या रस्त्यावर दुपारी २ ते रात्री १२ पर्यंत प्रवेश बंद असेल.
– पंचवटीकडून काट्या मारुती चौक, कन्नमवार पूल, द्वारका सिग्नलमार्गे नाशिक, नाशिकरोड, अंबड, सातपूर व इतरत्र वाहने जातील.
– अशोकस्तंभ, रामवाडी, मखमलाबाद नाका, पेठ नाका, दिंडोरी नाक्यावरून पंचवटीच्या इतर भागांत वाहने जातील.
पत्नीच्या माहेरी जाऊन पतीनं केलं असं काही की दोन्ही कुटुंबं हादरली; अंगावर शहारे आणणारी घटना
हे लक्षात घ्या…

– अडचणी उद्भवल्यास वाहतूक नियंत्रण कक्षात संपर्क साधा (०२५३-२३०५२२८)
– अशोकस्तंभ ते रविवार कारंजा हा दुतर्फा रस्ता ‘नो पार्किंग झोन’
– वाहतूक पोलिसांच्या अधिसूचनेचे उल्लंघन केल्यास मोटार वाहन अधिनियम १९८८ आणि मुंबई पोलिस अधिनियम १९५१ अंतर्गत कायदेशीर कारवाई करण्यात येईल
– अधिसूचनेतील नियम पोलिस सेवेतील वाहने, रुग्णवाहिका व अग्निशमन दलातील वाहनांना लागू नसतील

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed