नाशिकमधील प्रसिद्ध आयुर्वेदिक तज्ज्ञ डॉ. मनिषा जेजुरकर आत्महत्या प्रकरणात मोठी अपडेट आली आहे, डॉ. निलेश जेजुरकर यांना न्यायालयाने १६ मार्चपर्यंत अटकेपासून दिलासा दिला आहे.
डॉ. निलेश जेजुरकर यांच्याविरुद्ध डॉ. मनिषा जेजुरकर यांच्या आत्महत्या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर ते फरार होते. त्यांनी न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. मा. न्यायालयाने त्यांच्या अटकपूर्व जामिनाच्या अर्जावर सुनावणी घेत त्यांना दिलासा दिला आहे. पुढील सुनावणी होईपर्यंत त्यांना अटक न करण्याचे आदेश मा. न्यायालयाने दिले आहेत.
अटकपूर्व जामिनावर न्यायालयाचा दिलासा
डॉ. निलेश जेजुरकर यांनी दाखल केलेल्या अटकपूर्व जामिनाच्या अर्जावर सुनावणी करताना न्यायालयाने पुढील सुनावणीपर्यंत त्यांना अटक न करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे या प्रकरणात त्यांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे.
Solapur News : पत्नी पोलीस दलात, स्वत: एसआरपीएफमध्ये; जवानाने अचानक स्वतःला संपवलं, हसता-खेळता संसार उद्ध्वस्त
नातेवाईकांचे गंभीर आरोप
डॉ. मनिषा जेजुरकर यांनी आत्महत्या केल्यानंतर त्यांच्या माहेरच्या नातेवाईकांनी डॉ. निलेश जेजुरकर यांच्यावर विवाहबाह्य संबंध असल्याचा आरोप केला होता. तसेच डॉ. मनिषा यांच्या आत्महत्येस तेच जबाबदार असल्याचा आरोपही नातेवाईकांकडून करण्यात आला आहे.
जिल्हा रुग्णालयात मानसोपचार तज्ञ
निलेश जेजुरकर हे नाशिक येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात मानसोपचार तज्ञ म्हणून कार्यरत आहेत. या प्रकरणी न्यायालयाने दिलेल्या आदेशामुळे सध्या त्यांना अटकेपासून दिलासा मिळाला असून, पुढील सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Lakhpati Didi Yojana : ग्रामीण रणरागिणींची दमदार भरारी; 37 लाख ‘लखपती दीदी’, आता 25 लाख नव्या उद्योजकांचं लक्ष्य
दरम्यान, गंगापूर रोड परिसरातील डी. के. नगर येथे राहणाऱ्या प्रसिद्ध आयुर्वेदिक तज्ञ डॉ. मनिषा जेजुरकर (वय ४०) यांनी ६ मार्च रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास राहत्या घरी खिडकीच्या लोखंडी रॉडला नायलॉन दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली होती. बेशुद्ध अवस्थेत त्यांना दुपारी २.४० वाजता जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र. डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली असून पुढील तपास सुरू आहे.
