• Mon. Mar 16th, 2026
    Solapur News : पत्नी पोलीस दलात, स्वत: एसआरपीएफमध्ये; जवानाने अचानक स्वतःला संपवलं, हसता-खेळता संसार उद्ध्वस्त

    सोलापुरात एसआरपीएफ जवानाने गळफास घेऊन जीवन संपवलं आहे. दौंड येथील राज्य राखीव पोलीस दलात कार्यरत असलेल्या विलास शिंदे यांनी टोकाचे पाऊल उचलल्याने खळबळ उडाली आहे.

    मुळेगाव येथे एसआरपीएफ जवानाची राहत्या घरी आत्महत्या(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    इरफान शेख, सोलापूर : सोलापुरात एक खळबळजनक आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. दौंड येथील एसआरपीएफच्या एका जवानाने सोलापूरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. विलास सर्जेराव शिंदे (वय ३५) असे आत्महत्या केलेल्या एसआरपीएफ जवानाचे नाव आहे. विलास शिंदे हे मूळचे कळंब (जिल्हा धाराशिव) येथील रहिवासी होते. मागील अनेक वर्षांपासून ते सासरच्या घरी मुळेगाव (दक्षिण, सोलापूर) येथे राहत होते. एसआरपीएफ जवानाने आत्महत्या केल्याने सोलापुरात खळबळ उडाली आहे. ही घटना १२ मार्च रोजी गुरुवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास समोर आली. विलास शिंदे यांना गुरुवारी रात्रीच सोलापूर येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

    दौंड येथे एसआरपीएफमध्ये कार्यरत

    विलास शिंदे हे दौंड येथील एसआरपीएफ बल गट क्रमांक ७ मध्ये कार्यरत होते. त्यांच्या पत्नी पूनम शाम काळे या सोलापूर शहर पोलीस मुख्यालयात पोलीस म्हणून कार्यरत आहेत. विलास शिंदे यांच्या पश्चात आई, पत्नी पूनम काळे, ३ वर्षांचा मुलगा आणि ५ वर्षांची मुलगी असा परिवार आहे.Maharashtra TimesNashik News : डॉ. मनिषा जेजुरकर प्रकरणात निलेश जेजुरकरांना अटकेपासून तात्पुरता दिलासा, नातेवाईकांनी केलेले गंभीर आरोप

    डॉक्टरांनी मृत घोषित केले

    १२ मार्च २०२६ रोजी रात्री आठच्या सुमारास विलास शिंदे यांनी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ते अनेक वर्षांपासून सोलापुरात पत्नी आणि मुलांसोबत राहत होते. गळफास घेतल्याची माहिती मिळताच नातेवाईकांनी त्यांना बेशुद्ध अवस्थेत सोलापूर शहरातील खाजगी रुग्णालयात दाखल केले; मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. मृतदेहाचे शवविच्छेदन सोलापूर येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात करण्यात आले आहे.

    २०१४ मध्ये प्रेमविवाह

    एसआरपीएफ जवान विलास शिंदे यांच्या पश्चात आई, पत्नी पूनम काळे, ३ वर्षांचा मुलगा आणि ५ वर्षांची मुलगी असा परिवार आहे. नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, विलास शिंदे आणि पूनम काळे यांचा २०१४ मध्ये प्रेमविवाह झाला होता. दोघांचा संसार सुखाने सुरू होता. मात्र अचानक विलास शिंदे यांनी टोकाचे पाऊल उचलल्याने कुटुंबावर शोककळा पसरली आहे. या प्रकरणाचा तपास तालुका पोलीस करत आहेत.

    सुनिल लाटे

    लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे, हे एक पत्रकार आहेत. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ येथून बी.ए व एम.ए. पत्रकारितेचं पदव्यूत्तर शिक्षण पूर्ण केलं आहे. कॉलेज जीवनातच ‘दैनिक दिव्य मराठी’मध्ये पत्रकारितेचं प्रत्यक्ष प्रशिक्षण घेतलं आहे. दोन वर्षे ‘लोकसत्ता डॉट कॉम’साठी ‘फोटोगॅलरी व वेबस्टोरी’ या विभागात काम केलं आहे. ते ६ ऑक्टोबर २०२५ पासून ‘महाराष्ट्र टाईम्स’ ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. राजकारण, मनोरंजन, क्रीडा या विषयांच्या लिखाणात आवड आहे. याशिवाय काव्य लेखन, गीत लेखन आणि सादरीकरणातही स्वारस्य आहे. फोटोग्राफी, फोटो, व्हिडिओ संपादनातही खास रस आहे… आणखी वाचा