मंडळ आणि डीजे ऑपरेटरवर करवाई होणार:
काल राजारामपुरी येथे पार पडलेल्या मिरवणुकीत तब्बल ४२ मंडळांनी मिरवणुकीसाठी परवानगी मागितली होती. यापैकी ३६ मंडळं मिरवणुकीत सहभागी झाली होती. यापैकी सर्वांनीच डीजे आणि साऊंड सिस्टिम लावली होती. या सर्व मंडळांच्या साऊंड सिस्टीमच्या आवाज मर्यादेचे नमुने घेण्यात आले आहेत, असं महेंद्र पंडित म्हणाले.
ज्या मंडळाचे आवाज हे मर्यादेपेक्षा जास्त असेल अशा सर्व मंडळांना आणि डीजे ऑपरेटर्सला नोटीस पाठवण्यात येणार असल्याचे पोलीस अधीक्षकांनी सांगितले आहे. तसेच नियमानुसार ६० दिवसात या मंडळाकडून आणि डीजे ऑपरेटर्सकडून उत्तर येणे अपेक्षित असून त्यानुसार त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असेही पोलीस अधीक्षकानी सांगितले आहे.तसेच गेल्या ५ वर्षात २० ते २५ जणांवर कारवाई करण्यात आली असून यात यंदा वाढ होऊ शकते, असा इशारा पोलीस अधीक्षकांनी दिला आहे.
यासंदर्भात पुरवठा विभागाने कारवाई करणे अपेक्षित:
दरम्यान कालच्या मिरवणुकीत अनेक मंडळांकडून फुलं आणि रंगीबेरंगी कागद उडवण्यासाठी वापरण्यात आलेल्या फ्लॉवर मशिनला लावण्यात आलेले गॅस सिलेंडर देखील धोकादायक पद्धतीने लावण्यात आला होते. याबाबत देखील पोलीस अधीक्षकांनी या संदर्भात भाष्य केल्य असून घरगुती सिलेंडर अथवा व्यावसायिक सिलेंडर वापरण्यावर नियम असणे गरजेचे आहे. कालच्या मिरवणुकीत वापरण्यात आलेले सिलेंडर हे धोकादायक पद्धतीने जनरेटरच्या बाजूला ठेवण्यात आले होते. यासंदर्भात पुरवठा विभागाने कारवाई करणे अपेक्षित आहे आणि या संदर्भात आम्ही त्यांना सूचना देऊ असेही पोलीस अधीक्षकांनी यावेळी सांगितले आहे.