• Thu. Mar 19th, 2026

    Maharashtra Weather: महाराष्ट्रात पावसाचा ‘यलो अलर्ट’, 17 -20 मार्च मुसळधार पावासाची शक्यता; हवामान विभागाचा अंदाज

    Maharashtra Weather: महाराष्ट्रात पावसाचा ‘यलो अलर्ट’, 17 -20 मार्च मुसळधार पावासाची शक्यता; हवामान विभागाचा अंदाज

    Maharashtra Rain Alert: राज्यातील हवामान झपाट्याने बदलत असून अनेक दिवसांपासून पावसाची स्थिती निर्माण झाली आहे. यामुळे मुंबईसह परिसरात वाढलेली उष्णता कमी झाली असून नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

    मुंबई: राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून पावसाने हजेरी लावली आहे. यामुळे कडाकाच्या उन्हापासून नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. मार्च महिना सुरू झाल्यापासून मुंबईसह राज्यात उष्णतेच्या लाटांमुळे घराबाहेर पडणे कठीण झाले होते. पण गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात होणाऱ्या पावसामुळे तापमानात घट झाली आहे. सोमवारीही हवामान विभागाकडून काही भागांना यलो अलर्ट देण्यात आला असून, येत्या दोन-तीन दिवसांत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे.

    मुंबईतील तापमानात घट

    मुंबईमध्ये गेल्या आठवड्यात तापमान 40 अंश सेल्सिअसवर पोहचलं होतं. त्यानंतर शुक्रवारपासून तापमानात घट झाली असून सोमवारी कमाल तापमान 33 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. दरम्यान, किमान तापमान 23 अंश सेल्सिअस असेल. सतत बदलत्या हवामानामुळे तापमानात घट होत आहे.वेस्टर्न डिस्टरबन्समुळे येणाऱ्या लाटांमुळे उत्तर भारतातील हवामानात मोठे बदल झाले आहेत. त्याचा फटका महाराष्ट्रातील काही भागांनाही बसत आहे.Maharashtra TimesMaharashtra Weather: महाराष्ट्रात पावसाची स्थिती, उष्णतेचा कडाका कमी होण्याची शक्यता; हवामान खात्याने वर्तवला अंदाज

    पावसाची शक्यता

    सोमवारी मध्य महाराष्ट्रासह विदर्भात पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली गेली आहे. दरम्यान, 17 मार्च ते 20 मार्च दरम्यान महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यात मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विदर्भ, मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्रातील काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. यामुळे उन्हाचा कडाका कमी होणार असून नागरिकांना काहीसा दिलासा मिळणार आहे. परंतु, या पावसामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

    मुंबई, पुण्यात नागरिक उन्हाने हैराण झाले असतानाच, राज्यातील इतर भागांवर पावसाचं संकट आहे. शनिवार आणि रविवारी राज्यात कोल्हापूर जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली. सोमवारी विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. दरम्यान, 17-18 मार्चपासून या भागांत पाऊस पडायला सुरुवात होणार असून, 19 ते 20 मार्चपर्यंत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.

    दरम्यान, शनिवारी अकोला जिल्ह्यात राज्यातील सर्वाधिक तापमान नोंदवलं गेलं. जिल्ह्यात 41.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली असून वाशिम जिल्ह्यात सर्वात कमी किमान तापमान नोंदवलं गेलं असून 17.6 अंश सेल्सिअश इतकं होतं.

    सानिया कदम

    लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम, मटा ऑनलाईनमध्ये कन्सल्टंट पदावर कार्यरत आहे. प्रामुख्याने क्राइम, सिव्हिक आणि पॉलिटिक्स या बातम्या कव्हर करते. याआधी सहा महिने महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमध्ये कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून काम केले आहे. त्या काळात कॉलेज इव्हेंट्स, शैक्षणिक उपक्रम आणि सोशल मीडियावरील ट्रेंड्सवर बातम्या केल्या. मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून BMM मध्ये पदवी घेतल्यानंतर सध्या के.सी. महाविद्यालयात MA in Communication and Journalism करत आहे. इंटरनॅशनल घडामोडी आणि पॉप कल्चर हे विषय विशेष आवडीचे असून इंग्लिश आणि मराठी या दोन्ही भाषेत वाचन व लेखन करण्याची आवड आहे.… आणखी वाचा