• Sun. Jun 7th, 2026

    Water Level In Dams: मुंबईकरांनो, पाणी जरा जपून वापरा! सातही धरणांत 46 टक्केच साठा, कोणत्या धरणात किती पाणी?

    Water Level In Dams: मुंबईकरांनो, पाणी जरा जपून वापरा! सातही धरणांत 46 टक्केच साठा, कोणत्या धरणात किती पाणी?

    Mumbai Dam Water Level: वाढलेल्या उष्णतेमुळे पाण्याची मागणी वाढत आहे. त्याचबरोबर बाष्पीभवनामुळे धरणांतील पाणीपातळीही झपाट्याने कमी होत आहे.

    मुंबई पाणीसाठा(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    मुंबई : उन्हाळ्याच्या झळा मार्चच्या मध्यातच तीव्र झाल्याने मुंबईकरांना उष्णतेचा ताप सहन करावा लागत असतानाच मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात जलाशयांतील जलसाठ्यावरही त्याचा परिणाम जाणवू लागला आहे. आताच या जलाशयांतील जलसाठा निम्म्यावर आला असल्याने उर्वरित तीन महिने मुंबईकरांना पाणी जपून वापरावे लागणार आहे.

    सद्यःस्थितीत सातही धरणांतील जलसाठा ४६ टक्के आहे. गेल्या वर्षापेक्षा हा साठा चार टक्क्यांनी जास्त आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, सात धरणांपैकी मध्य वैतरणातील पाणीसाठा गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा कमी झाला आहे. या जलाशयात सध्या ८१ हजार २६९ दशलक्ष लिटर पाणीसाठा शिल्लक आहे.

    Maharashtra TimesMumbai News: सत्ताधाऱ्यांवर निधीवर्षाव! मुंबई महापालिकेकडून आमदार, खासदारांना तीन वर्षांत 1600 कोटी
    मुंबईला पाणीपुरवठा हा मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा , विहार, तुळशी आणि राज्य सरकारच्या अप्पर वैतरणा , भातसा या सात तलावांतून होतो. सातही तलावांची पाणी साठवण क्षमता ही १४ लाख ४७ हजार ३७७ दशलक्ष लिटर आहे. या तलावांतून दररोज चार हजार दशलक्ष लिटर पाणीपुरवठा विविध जलवाहिन्यांद्वारे करण्यात येतो.

    पुरवठा होऊनही आपत्कालीन परिस्थितीसाठी राज्य सरकारच्या अखत्यारित असलेले अप्पर वैतरणा आणि भातसामध्ये राखीव साठाही कायम असतो. हा साठा उपलब्ध करण्यासाठी राज्य सरकार निर्णय घेते. उपलब्ध धरणातील पाणीसाठा खूपच कमी झाल्यानंतरच राखीव कोट्यातील पाणीसाठ्याचा वापर केला जातो.

    उपलब्ध पाणीसाठा
    १५ मार्च २०२६ : ४६ टक्के
    १५ मार्च २०२५ : ४२ टक्के
    शिल्लक पाणीसाठा ६,६८,११० दशलक्ष लिटर
    दररोज होणारा पाणीपुरवठा ४ हजार दशलक्ष लिटर

    Maharashtra TimesDevendra Fadnavis: देवेंद्र फडणवीसांवर टीका, सरकारी कर्मचाऱ्यांच्या नियमावलीचा भंग केल्याचा आरोप; स्थगन प्रस्तावाबाबत अखेर डॉ. दीपक पवारांना दिलासा
    उर्वरित पाच धरणांतील पाणीसाठ्याची सद्यःस्थिती
    अप्पर वैतरणा
    एकूण क्षमता : २ लाख २७ हजार ४७ दशलक्ष लिटर
    सध्याचा साठा: ५५ टक्के
    मोडक सागर
    एकूण क्षमता : १ लाख २८ हजार ९२५ दशलक्ष लिटर
    सध्याचा साठा : ३८.३१ टक्के
    तानसा
    एकूण क्षमता : १ लाख ४५ हजार ८० दशलक्ष लिटर
    सध्याचा साठा : ४१.९५ टक्के
    विहार
    एकूण क्षमता : २७ हजार ६९८ दशलक्ष लिटर
    सध्याचा साठा: ६२.८१ टक्के
    तुळशी
    एकूण क्षमता : ८ हजार ४६ दशलक्ष लिटर
    सध्याचा साठा: ५०.१९ टक्के

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये ३ वर्षांपासून कन्सल्टंट म्हणून कार्यरत आहे.या आधी सकाळ मिडियामध्ये २ वर्ष कामाचा अनुभव आहे. चालू घडामोडी, गुन्हेगारी, राजकीय विषयांच्या बातम्यांत विशेष आवड.… आणखी वाचा