• Fri. Mar 20th, 2026
    Ahilyanagar Crime : विरोध करताच मारण्याची धमकी, कीर्तनकार महाराजकडून अल्पवयीन मुलीवर पाच वर्ष अत्याचार; वारकरी संप्रदायला काळिमा

    Ahilyanagar Parner Crime News : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे. त्याचदरम्यान, पारनेर तालुक्यात एक संतापजनक प्रकार समोर आला आहे. त्यामुळे अहिल्यानगरमध्ये संतापाची लाट पसरली आहे.

    पारनेर किर्तनकार यशवंत थोरात मुलीवर अत्याचार(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    अनिकेत यादव, अहिल्यानगर (पारनेर) : वारकरी परंपरेला काळिमा फासणारी संतापजनक घटना अहिल्यानगरमधील पारनेर तालुक्यामधील ढवळपुरी येथे उघडकीस आली आहे. श्री. दुर्गादेवी वारकरी शिक्षण संस्थेचा अध्यक्ष व कीर्तनकार यशवंत एकनाथ थोरात उर्फ अण्णासाहेब गुंजाळ या नराधमाने एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीवर तब्बल पाच वर्ष धाक दाखवत वारंवार अत्याचार केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. एवढंच नव्हे तर नराधम आरोपीने मुलीला गरम लोखंडी पकडने चटके देत अमानुष मारहाण केल्याचंही फिर्यादीत नमूद करण्यात आलं आहे.

    घरी कोणी नसताना वारंवार अत्याचार

    पीडित मुलगी इयत्ता आठवीत शिकत असतानाच हा प्रकार सुरू होता. आरोपी यशवंत थोरात हा पीडितेच्या घराशेजारीच राहत असल्यानं दोन्ही कुटुंबांमध्ये कौटुंबिक संबंध होते. पीडितेचा भाऊ आरोपीच्या वारकरी शिक्षण संस्थेत सचिव म्हणून कार्यरत असल्याचा फायदा घेत आरोपीने 2021 पासून पीडित मुलीवर वाईट नजर ठेवली. मुलगी घरी एकटी असताना त्याने तिच्यावर वारंवार बळजबरीने अत्याचार केल्याचं समोर आलं आहे. पीडितेने विरोध करण्याचा प्रयत्न केला असता आरोपीने तिला जीवे मारण्याची धमकी दिली. ‘मी दोन हाफ मर्डर केले आहेत, जर कोणाला काही सांगितलं तर तुझ्या आई-वडिलांना आणि भावाला मारून टाकीन,’ अशी भीती दाखवली.
    Maharashtra TimesPune Accident : डम्परची दुचाकीला धडक, पुण्यात आजोबा-नातीचा एकाचवेळी मृत्यू, कुटुंबावर दुःखाचा डोंगर

    मारहाणीमुळे पीडितेला चालणंही कठीण

    कुटुंबाला काही होऊ नये म्हणून पीडितेला हा छळ अनेक वर्ष गुपचूप सहन करावा लागला. दरम्यान, 10 मार्च 2026 रोजी या अत्याचाराचा कळस गाठला. आरोपीने पीडितेला फोन करून आपल्या घरी बोलावलं. तिने येण्यास नकार दिला असता कुटुंबाला ठार मारण्याची धमकी दिली. भीतीपोटी पीडिता त्याच्या घरी गेली असता आरोपीने तिला कॉम्प्यूटर रूममध्ये नेऊन बांबू व चापट्यांनी बेदम मारहाण केली. त्यानंतर स्वयंपाकघरातील लोखंडी पकड गॅसवर तापवून तिच्या शरीरावर चटके देत अमानूष अत्याचार केला. या क्रूर मारहाणीमुळे पीडितेला चालणंही कठीण झालं होतं.
    Maharashtra TimesMaharashtra Weather: महाराष्ट्रात पावसाचा ‘यलो अलर्ट’, 17 -20 मार्च मुसळधार पावासाची शक्यता; हवामान विभागाचा अंदाज

    अत्याचाराचा थरार केला उघड

    14 मार्च 2026 रोजी तिचा भाऊ घरी आल्यानंतर तिची गंभीर अवस्था पाहून त्याने तिला विश्वासात घेतलं. त्यानंतर मावस भावांच्या उपस्थितीत पीडितेने मागील पाच वर्षांपासून सुरू असलेल्या अत्याचाराचा सर्व कहाणी सांगितली. त्यानंतर पीडितेच्या भावाने पारनेर पोलीस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दाखल केली. पारनेर पोलिसांनी याप्रकरणी यशवंत एकनाथ थोरात याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता तसेच बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा अंतर्गत विविध गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल केला असून आरोपीला तात्काळ अटक करण्यात आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे.

    प्रशांत पाटील

    लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत संजय पाटील २०१९ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये सिनीयर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत असताना राज्यभरातील ग्रामीण भागातील बातम्या, राजकीय बातम्यांची आवड, हायपरलोकल बातम्या, क्राइम बातम्या अर्थात विशेष घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सतत प्रयत्न असतो. गावाखेड्याकडच्या बातम्या, शेतकऱ्यांचा प्रश्न, शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत. यापूर्वी थोडक्यात न्यूज पोर्टल, आधान न्यूज पोर्टल, महाराष्ट्र टाइम्स डिजिटल आणि सकाळ मीडिया ग्रुप या संस्थांमध्येही कामाचा अनुभव असून पुण्यातील गरवारे महाविद्यालयातून पत्रकारितेत पदवी प्राप्त केली आहे.… आणखी वाचा