• Sun. Mar 8th, 2026
    राज्यासाठी पुढचे काही तास महत्त्वाचे, हवामान खात्याकडून मुंबईसह या भागांना अलर्ट जारी…

    मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांपासून पाऊस सक्रीय झाला असून पुढच्या काही दिवस पाऊस असाच बरसेल अशी शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. अशात पुढच्या काही तासांमध्ये मुंबईसह अनेक भागांना हवामान खात्याकडून मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. यामुळे नागरिकांनी पावसाचा अंदाज घेत घराबाहेर पडावं, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत.

    मुंबई आयएमडीने दिलेल्या माहितीनुसार, पुढच्या ३-४ तासांमध्ये ठाणे, मुंबईसह अनेक उपनगरांमध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. खरंतर, सध्या राज्यात गणेशोत्सवाची धूम आहे. अशात आज दीड दिवसाच्या बाप्पाचे विसर्जन आहे. पण यावेळी पावसाचं सावट असेल, अशी माहिती आहे.

    Maharashtra Rain News : राज्यात आज पावसाचं सावट; मुंबई, पुण्यासह या भागांना हवामान खात्याचा इशारा
    हवामान खात्याच्या अंदाजानुसार, पुढील ३-४ तासांत रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हलक्या सरी पडण्याची शक्यता आहे. काही भागात वादळी वाऱ्यासह मेघगर्जना/विजांचा कडकडाट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडताना खबरदारी घ्यावी.

    दरम्यान, पुढच्या २ दिवसांमध्ये पुण्यासह राज्यभरात पावसाचा जोर पाहायला मिळेल तर आज बुधवारी विदर्भात गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोकण परिसरामध्ये तुरळक पाऊस होईल, असा अंदाज आहे. तर राज्यात पुढच्या ३-४ दिवसांमध्येदेखील पाऊस सक्रिय असेल असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.

    नाशिकमध्ये मुसळधार पाऊस, फरशी पूल पाण्याखाली; नागरिकांचा पुराच्या पाण्यातून मुलाबाळांसह

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed