• Mon. Nov 25th, 2024
    गुड न्यूज, अखेर मान्सूनचं महाराष्ट्रात आगमन,कुठंपर्यंत पोहोचला, जाणून घ्या अपडेट

    मुंबई : महाराष्ट्रातील प्रत्येक जण ज्या गोष्टीची गेल्या काही दिवसांपासून आतुरतेनं वाट पाहत होता. तो दिवस आज उजाडला आहे. महाराष्ट्रात मान्सूनचं आगमन झालेलं आहे. दक्षिण महाराष्ट्रात पावसानं हजेरी लावली आहे. ८ जून रोजी केरळमध्ये मान्सून दाखल झाल्यानंतर अवघ्या दोन दिवसांनतर महाराष्ट्रात मान्सून दाखल झाला आहे. महाराष्ट्रातील रत्नागिरीमध्ये मान्सून पोहोचला आहे. भारतीय हवामान विभागाकडून ही माहिती देण्यात आली आहे. दरवर्षीच्या तुलनेत मान्सून यंदा चार ते पाच दिवस उशिरा आलेला आहे.

    भारतीय हवामान विभागाच्या माहितीनुसार सध्या मान्सून महाराष्ट्रातील रत्नागिरीपर्यंत पोहोचला आहे. तर कर्नाटकातील शिमोगा, हसन या शहरांसह धर्मपुरी, श्रीहरी कोटा इथपर्यंत मान्सून पोहोचला आहे. मान्सून दाखल होण्याचा दरवर्षीचा अंदाज पाहता यंदा मान्सून चार ते पाच दिवस उशिरानं दाखल झाला आहे.

    मान्सून महाराष्ट्रात दाखल

    महाराष्ट्रातील शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिक मान्सून कधी दाखल होणार याकडे डोळे लावून बसले होते. अखेर राज्यात मान्सूनचं आगमन झालं आहे. महाराष्ट्रात आज म्हणजे ११ जून रोजी मान्सून दाखल झाला आहे. महाराष्ट्रात रत्नागिरीपर्यंत मान्सून पोहोचला आहे.
    तीन राज्यात डॉली की डोलीचा खेळ, लग्नाचा बनाव नंतर लुटून फरार व्हायचे, पोलिसांनी केला करेक्ट कार्यक्रम

    बिपरजॉयमुळं उशीर

    अरबी समुद्रात निर्माण झालेल्या बिपरजॉय वादळामुळं मान्सूनच्या आगमनाला उशीर झाला होता. अखेर मान्सून केरळमध्ये ८ जूनला म्हणजेच सात दिवस उशिरा दाखल झाला. केरळमध्ये मान्सून १ जूनला दाखल होतो. त्यानंतर मान्सून ७ जूनपर्यंत दाखल होतो. दरवर्षीच्या तुलनेत यंदा अरबी समुद्रात निर्माण झालेल्या बिपरजॉय वादळामुळं मान्सूनचं आगमन उशिरानं झालं.

    Cyclone Biparjoy : महाराष्ट्रावरील चक्रीवादळाचे सावट दूर? गुजरातला IMDचा यलो अलर्ट जारी

    खरिपाच्या कामांना वेग येणार

    खरीप हंगामातील पेरणीसाठी शेतकऱ्यांकडून पूर्वतयारी सुरु आहे. शेतकरी खरीप हंगामाच्या पेरणीसाठी मशागतीची काम करत आहेत. मान्सूनचं आगमन दक्षिण महाराष्ट्रात झाल्यानं शेतीच्या कामांना वेग येणार आहे. गतवर्षी अतिवृष्टी आणि अवकाळी पावसानं हैराण झालेल्या शेतकऱ्याला यंदाच्या मान्सूनकडून अपेक्षा आहेत. मान्सूनचा पाऊस व्यवस्थित झाल्यास राज्यातील शेतकरी शेतीतून भरघोस उत्पन्न काढू शकतात. त्यामुळं यंदाचा मान्सून शेतकऱ्यांना तारणारा ठरतो, हे येणाऱ्या काही दिवसांमध्ये ठरणार आहे.
    भारताला WTC Final मध्ये इतिहास रचण्याची संधी, आतापर्यंत एकाही देशाला ही गोष्ट जमली नाही…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed