Chhatrapati Sambhajinagar Retired professor found dead : सेवानिवृत्त राजाभाऊ लोंढे एकटेच राहत असत. तर पत्नी आणि मुले पुण्यात राहत होते. ‘लव्ह अँड डेअर’ नावाचा गेम शो तसेच ‘खतरों के खिलाडी’ असे शो तयार करण्याच्या नावाखाली विशाल राठोड याने त्यांच्याकडून सुमारे ५० लाख रुपये घेतले होते
काय आहे प्रकरण?
पाच फेब्रुवारी २०२६ रोजी उस्मानपुरा पोलिस ठाण्याच्या हद्दीत उस्मानपुरा भागातील ज्योतीनगर येथे अभिरिका अपार्टमेंट येथे राहणारे राजाभाऊ लोंढे हे हरविल्याची तक्रार राजाभाऊ लोंढे यांचे भाऊ उत्तम लोंढे यांनी दाखल केली होती. या प्रकरणात पाच फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री नऊ वाजण्याच्या दरम्यान विशाल राठोड, आकाश पवार आणि अन्य दोन जणांसोबत पार्टीसाठी गेल्याची माहिती देण्यात आली होती. हरविलेल्या व्यक्तीबाबत तिघांनाही माहिती विचारली असता, त्यांनी राजाभाऊ लोंढे यांना सिग्मा हॉस्पिटलजवळ सोडल्याचे सांगितले.या प्रकरणात उस्मानपुरा पोलिस ठाण्याच्या तपासासोबत गुन्हे शाखेच्या पोलिसांना समांतर तपासाचे आदेश पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी दिले. या प्रकरणात गुन्हे शाखेच्या पथकाने बेपत्ता राजाभाऊ लोंढे यांच्यासोबत रात्री उशिरापर्यंत असलेल्यांची चौकशी केली. विशाल राठोड, आकाश पवार आणि अन्य दोन जणांनी दिलेल्या माहितीची तांत्रिक तपास सुरू केला असता, शहरातील सीसीटीव्हीची पाहणी केली; तसेच राजाभाऊ लोंढे यांच्या बाबत माहिती जमा करण्यास सुरुवात केली.
या प्रकरणात तांत्रिक तपासणी केल्यानंतर विशाल राठोड सह अन्य साथीदार यांचा जबाब आणि सीसीटीव्हीच्या फुटेजमध्ये तफावत आढळली. या प्रकरणात विशाल राठोड, आकाश पवार आणि करण विलास आडे यांना ताब्यात घेतल्यानंतर राजाभाऊ लोंढे यांना पार्टीत दारू पाजून त्यांचे अपहरण करून त्यांच्या डोक्यात पिस्तुलाने गोळी घालून खून केल्याची कबुली दिली. लोंढे यांचा खून केल्यानंतर त्यांचे प्रेत गेवराई तांडा येथील जंगलात पुरले असल्याची माहिती दिली.
Jag Laadki : भारतीय जहाज ‘फुजैराह’मधून सुखरुप रवाना, 80800 टन कच्चं तेल घेऊन भारतीय ध्वजांकित ‘जग लाडकी’ मायदेशी येणार
‘खतरों के खिलाडी’साठी ५० लाख
सेवानिवृत्त राजाभाऊ लोंढे एकटेच राहत होते. त्यांची पत्नी आणि मुले पुण्यात राहत होते. विशाल राठोड हा इव्हेंट मॅनेजमेंटचे काम करत होता. ‘लव्ह अँड डेअर’ नावाचा गेम शो तसेच ‘खतरों के खिलाडी’ असे शो तयार करण्याच्या नावाखाली विशाल राठोड याने लोंढे यांच्याकडून सुमारे ५० लाख रुपये घेतले होते. मात्र, शो प्रत्यक्षात सुरू होत नसल्याने लोंढे यांनी पैशांसाठी तगादा लावला होता, अशीही माहिती तपासातून समोर आहे.
सुट्टीत फिरायचा प्लॅन करताय? महाराष्ट्रातील १० बजेटफ्रेंडली ठिकाणांची यादी
फार्महाऊसवरील पार्टीनंतर खून
विशाल राठोडला ताब्यात घेतल्यानंतर, त्याने सांगितले की, लोंढे यांच्यासह मागील काही दिवसांपासून पैशांच्या देवाणघेवाणीवरून वाद सुरू होते. त्यामुळे तो त्यांना ठार मारण्याची संधी शोधत होता. पाच फेब्रुवारीला दौलताबाद येथे चौधरी फार्म हाउसवर असलेल्या पार्टीत त्याला संधी मिळाली. लोंढे यांना विशालने आणि त्याच्या साथीदारांनी खूप दारू पाजली. नंतर त्यांना ते शुद्धीत नसताना गाडीतून सोबत नेले. रेल्वे पुलाजवळ साजापूर शिवारात गाडी थांबवून पिस्तुलाने लोंढे यांच्या डोक्यात गोळी घालून त्यांचा खून केला.
Pune Accident : डम्परची दुचाकीला धडक, पुण्यात आजोबा-नातीचा एकाचवेळी मृत्यू, कुटुंबावर दुःखाचा डोंगर
या प्रकरणात विशाल राठोड, आकाश पवार आणि करण आडे या तिघांना उस्मानपुरा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. ही कारवाई पोलिस आयुक्त प्रविण पवार, पोलिस उपायुक्त रत्नाकर नवले, सहायक पोलिस आयुक्त अशोक राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक गजानन कल्याणकर, पोलिस उपनिरीक्षक प्रवीण वाघ, अर्जुन कदम, अभिजीत चिखलीकर यांच्यासह पोलिस हवालदार विजय निकम, विजय घुगे, राहुल बंगाळे, अभिषेक साठे, सागर शेंडे, महिला पोलिस अंमलदार पूजा भोसले, माया माळी, वनिता तुपे, चालक पोलिस हवालदार तात्याराव शिंगारे यांच्यासह उस्मानपुरा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संग्राम ताठे, सहायक पोलिस निरीक्षक शिवाजी चौरे, पोलिस अंमलदार विलास कऱ्हाळे यांनी केली. राजाभाऊ लोंढे खुनाच्या प्रकरणात विशाल राठोड, आकाश राठोड आणि करण आडे या तिघांना न्यायालयात हजर करण्यात आले. कोर्टाने तिघांनाही तीन दिवसांच्या पोलिस कोठडीचे आदेश दिले.
