• Mon. Jun 15th, 2026

    Borivali-Gorai Ferry: बोरिवली ते गोराई नव्या जेट्टीमुळे प्रवास 15 मिनिटांत, पण बांधकामाचा प्रवाशांना फटका; अरुंद मार्गामुळे गर्दीत वाढ

    Borivali-Gorai Ferry: बोरिवली ते गोराई नव्या जेट्टीमुळे प्रवास 15 मिनिटांत, पण बांधकामाचा प्रवाशांना फटका; अरुंद मार्गामुळे गर्दीत वाढ

    Borivali to Gorai Ro Ro Ferry: बोरिवली ते गोराई नव्या फेरीमुळे दीड तासांचा प्रवास 15 मिनिटांत होणार आहे. पण सध्या जेट्टीचं बांधकाम सुरू असल्यामुळे सध्या सुरू असलेल्या जेट्टीचा मार्ग अरुंद झाला आहे. यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    मुंबई: बोरिवली ते गोराई रो-रो फेरीच्या मार्गावर एका नव्या जेट्टीचं काम सुरू आहे. या मार्गावरून सध्या अनेक व्यावसायिक, कर्मचारी आणि पर्यटक गोराई खाडी ओलांडून जातात. वाढत्या प्रवासी संख्येमुळे नव्या जेट्टीची सुरूवात करणे गरजेचं आहे. पण सध्या सुरू असलेल्या बांधकामामुळे अनेक नागरिकांचा त्रास वाढला आहे. त्यासोबतच सुरक्षेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.

    दीड तासांचा प्रवास 15 मिनिटांत

    सध्या बोरिवली ते गोराई प्रवासाला 1 ते दीड तास लागतो. या नव्या रो-रो जेट्टीमुळे प्रवास केवळ 15 मिनिटांत होणार आहे. त्यामुळे प्रवाशांसाठी ही नवी जेट्टी सोयीची ठरणार आहे. बोरिवली ते गोराई रो-रो फेरीने मोठ्या संख्येने प्रवासी प्रवास करतात. तसेच, भाडे केवळ 10-15 रुपये असल्यामुळे पर्यटकांसह कर्मचाऱ्यांसाठीही हा खिशाला परवडणारा मार्ग ठरतो आहे. पण प्रवासात भरपूर वेळ खर्च होतो. त्यामुळे या नव्या रो-रो फेरीला मंजुरी मिळाली होती. या नव्या फेरीसाठी जेट्टीचं काम सुरू आहे. हे पूर्ण होताच प्रवाशांना मोठी जागा उपलब्ध होणार आहे.Maharashtra TimesST Bus: एसटीच्या ‘ई-बस’ ठरत आहेत तोट्याचं कारण, दरवर्षी बसेल 1,489 कोटींचा फटका; महामंडळाची प्रकल्प रद्द करण्याची मागणी

    सध्या या जेट्टीचं बांधकाम सुरू आहे. गेल्या वर्षी फेरीच्या वाहतुकीवर देखरेखीसाठी काही कर्मचार्‍यांची नियुक्ती केली होती. फेरीवरती प्रवासी आणि वाहनांची गर्दी होऊ नये या गोष्टीवरती लक्ष ठेऊन सर्व प्रवासी लाइफ जॅकेट घालून प्रवास करतील याची खात्री करून घेणं त्यांचं काम होतं. पण गेले अनेक दिवस असे सुरक्षारक्षक जेट्टीवर उपस्थित नाहीत अशी माहिती काही प्रवाशांनी ‘मिड डे’शी बोलताना दिली आहे. यामुळे गर्दीवर नियंत्रण राहत नसून अनेक प्रवासी लाइफ जॅकेट शिवाय प्रवास करत असल्याचा त्यांनी यावेळी दावा केला आहे.

    बांधकामामुळे अरुंद जागा

    दरम्यान, नव्या जेट्टीच्या बांधकामामुळे या समस्यांमध्ये वाढ झाली आहे. बांधकामामुळे जेट्टी अरुंद झाली असून फेरीपर्यंत रुग्णवाहिका पोहचवणं कठीण झालं आहे. त्यात वीकेंडदरम्यान, वाहन आणि प्रवाशांची गर्दी वाढली की सुरक्षारक्षक नसल्यामुळे नियंत्रण ठेवणं अशक्य होतं. यामुळे फेरीवरून प्रवास करताना अपघातांचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. तसेच, रुग्णवाहिकेला अरुंद मार्गामुळे फेरीपर्यंत जाता आले नाही तर रस्तेमार्गे प्रवास करावा लागेल. भाईंदरमार्गाने जाताना वाहतूक कोंडीमुळे प्रवासात बराच वेळ खर्च होतो.

    Maharashtra TimesPune Metro: हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोची प्रतीक्षा संपेनाच, डिसेंबर, मार्चची ‘डेडलाइन’ हुकली; आता जुलै महिना उजाडणार

    दरम्यान, एका अधिकाऱ्याने मिड डे सोबत याबद्दल बोलताना सांगितले की चार ते पाच दिवसांत यावरती उपाय काढून प्रवाशांसाठी मार्ग मोकळा करण्यात येईल. तसेच, प्रवाशांना कोणत्याही अडचणी येणार नाहीत आणि प्रवास सुरक्षित होईल याकडेही लक्ष दिले जाईल.

    सानिया कदम

    लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम, मटा ऑनलाईनमध्ये कन्सल्टंट पदावर कार्यरत आहे. प्रामुख्याने क्राइम, सिव्हिक आणि पॉलिटिक्स या बातम्या कव्हर करते. याआधी सहा महिने महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमध्ये कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून काम केले आहे. त्या काळात कॉलेज इव्हेंट्स, शैक्षणिक उपक्रम आणि सोशल मीडियावरील ट्रेंड्सवर बातम्या केल्या. मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून BMM मध्ये पदवी घेतल्यानंतर सध्या के.सी. महाविद्यालयात MA in Communication and Journalism करत आहे. इंटरनॅशनल घडामोडी आणि पॉप कल्चर हे विषय विशेष आवडीचे असून इंग्लिश आणि मराठी या दोन्ही भाषेत वाचन व लेखन करण्याची आवड आहे.… आणखी वाचा