• Sat. Sep 21st, 2024
सांगलीतील १४ कोटींच्या दरोड्या प्रकरणी नवी अपडेट, ज्वेलर्स मालकानं पोलिसांना पत्र दिलं

सांगली : सांगली शहरातील मिरज रोडवरील मार्केट यार्ड येथील रिलायन्स ज्वेलर्समध्ये पडलेल्या सशस्त्र दरोड्यातील लुटीची रक्कम आता समोर आली आहे. दरोड्यात १४ कोटींचे दागिने लुटले नसून ६ कोटींची दागिने लुटल्याचं अखेर स्पष्ट झालं आहे. रिलायन्स ज्वेलर्सकडून चोरीस गेलेल्या दागिन्यांबद्दल अधिकृत मूल्यांकनाचे पत्र देण्यात आलं आहे.

सांगली शहरातील वर्दळीच्या मिरज रोडवरील मार्केट यार्डाजवळ असणाऱ्या रिलायन्स ज्वेलस या सोन्या-चांदीच्या शोरूमवर ४ जून रोजी धाडसी दरोडा पडला होता. सीबीआय अधिकारी असल्याचे सांगत दराडेखोरांनी शोरूममध्ये प्रवेश करत बंदुकीचा धाक दाखवून कर्मचारी आणि ग्राहकांना बंधक बनवून दुकान लुटलं होतं.

सांगलीत रिलायन्स ज्वेलर्सवर दरोडा; पोलीस समजून दरोडेखोरांना दुकानात घेतलं अन् तोंडाला चिकटपट्ट्या लागल्या
यादरम्यान दरोडेखोरांनी गोळीबार केल्याची देखील घटना घडली होती. भरदिवसा पडलेल्या दरोड्याने शहरात एकच खळबळ उडाली होती. या दरोड्यात दरोडेखोरांनी संपूर्ण दुकानाचा सुफडा साफ करत हिरे, सोन्याचे दागिने आणि रोकड असा मुद्देमाल लुटला होता. प्रथम तपासात सुमारे १४ कोटींची लूट दरोडेखोरांनी केल्याचं पोलीस तपासात समोर आले होते.

मात्र, आता रिलायन्स ज्वेलर्सकडून दुकानातील लुटीच्या दागिन्यांचे मूल्यांकन करून लुटीचा आकडा दिला आहे. लुटीच्या दागिन्यांची किंमत १४ कोटींची नसून ६ कोटी ४४ लाख असल्याचे पत्र रिलायन्स ज्वेलर्सकडून विश्रामबाग पोलिसांना देण्यात आले आहे. त्यामुळे रिलायन्स ज्वेलर्सवरील दरोडा १४ कोटींचा नसून ६ कोटींचा असल्याचं स्पष्ट झालं आहे.

छातीवर अन् चेहऱ्यावर सपासप वार, यात्रेतील जुन्या वादातून दाबेली विक्रेता असलेल्या गरीब मुलाला संपवलं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed