या प्रकरणी अधिक माहिती अशी की बीडमधील एमआयडीसी भागात हनुमान नगर मध्ये राहणाऱ्या निकिता ऋषिकेश कांबळे (वय वर्ष २१) हिचा विवाह एका वर्षापूर्वी ऋषिकेश कांबळे याच्यासह झाला होता. काही दिवस गुण्या गोविंदाने संसार झाल्यानंतर अचानक सासू आणि पतीकडून महिलेला त्रास सुरू झाला.
पती आणि सासू यांनी ‘तू आम्हाला आवडत नाहीस आणि तुला आजार देखील आहे. तू तुझ्या घरी जाऊन नीट होऊन ये’ असं सांगितलं. वादावादीत सून आपलं म्हणणं ऐकत नाही आणि तिचा कसलाही फायदा आपल्याला होत नाही, कारण घरातील सगळी कामं आपल्याला करावी लागतात आणि दुखण्याच्या बहाण्याने सून झोपून राहते, या कारणावरुन सासूने महिलेच्या अंगावर ज्वलनशील द्रव्य टाकलं, तर नवऱ्याने काडी लावत तिला पेटवून दिलं.
२३ वर्ष लेकीला सांभाळलं, पण डॉक्टर होण्याचं स्वप्न भंगलं; प्रतिष्ठेसाठी कुटुंबाने लेकीला संपवलं!
या घटनेमध्ये सून तब्बल ५८ टक्के भाजल्यामुळे तिच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू होते. १९ दिवस मृत्यूशी झुंज देणाऱ्या निकिता ऋषिकेश कांबळे हिचा अखेर मृत्यू झाला.
या प्रकरणी घटना झाल्यानंतर पोलिसांनी पती आणि सासू कुसुम कांबळे या दोघा मायलेकांना ताब्यात घेतले होते. मात्र आता तिचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्यावर कलम ३०२ देखील वाढवण्यात आला आहे. अवघ्या २१ वर्षांच्या विवाहित महिलेचा असा दुर्दैवी मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जाते आहे. या आरोपींना कठोरातील कठोर शिक्षा करण्यात यावी अशी देखील मागणी केली जात आहे.