Jalna News : जालना जिल्ह्यात एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. एका 25 वर्षीय तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने करुण अंत झाला आहे. या घटनेनं संपूर्ण जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे.
नेमकं काय घडलं?
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, गणेश केशव गावंडे हा तरुण आपल्या दुचाकीवरून अनवा येथून काही कामानिमित्त तालुक्याचे ठिकाण म्हणजे भोकरदन येथे काही कामानिमित्त जात असताना अचानक त्याला अस्वस्थ वाटू लागले. काही क्षणातच त्याला तीव्र छातीत दुखू लागल्याने आणि हृदयविकाराचा झटका आल्याने दुचाकीवरील त्याचा ताबा सुटला. त्यामुळे तो रस्त्यावरच कोसळला. ही घटना पाहून परिसरातील नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि त्याला मदत करण्याचा प्रयत्न केला. स्थानिक नागरिकांनी तत्परता दाखवत त्या तरुणाला जवळच्या रुग्णालयात नेण्याची व्यवस्था केली. मात्र रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
Nagpur News: दोन वर्षांपूर्वी बाप हरपला, आता मायेचे छत्रही गेले; मुलांसाठी झिजणाऱ्या आईचा उपचारादरम्यान मृत्यू
प्राथमिक माहितीनुसार, हृदयविकाराच्या झटक्यामुळेच त्याचा मृत्यू झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह पुढील वैद्यकीय तपासणीसाठी पाठविण्यात आला आहे. या घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. 25 वर्षीय तरुणाच्या आकस्मिक मृत्यूमुळे त्याच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून गावात शोककळा पसरली आहे. एवढ्या कमी वयात हृदयविकाराचा झटका आल्याने नागरिकांमध्येही चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
Ahilyanagar Crime : जामखेड कावेरी हॉटेल गोळीबार प्रकरण; 29 वर्षीय रोहित पवारवर जीवघेणा हल्ला, मुख्य सूत्रधाराला अटक
आई-वडील शेतात असताना आनंदाची बातमी
जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील गाव खेड्यातील एका सालगड्याच्या मुलाने आई-वडिलांचं नाव उज्वल केलं आहे. दुसऱ्यांच्या शेतात सालगडी म्हणून काम करणाऱ्या कुटुंबातील मुलाने जिद्द, मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर चार्टर्ड अकाऊंटंटची परीक्षा उत्तीर्ण होत वडिलांचं स्वप्न साकार केलं आहे. जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील क्षीरसागर येथील किसनराव कोलते यांचा मुलगा राजू कोलते याने नुकतीच सीएची परीक्षा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण केली असून, संपूर्ण परिसरातून त्याचे कौतुक होत आहे.
