• Sat. Sep 21st, 2024
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्यपालांच्या भेटीसाठी राजभवनात, कारण काय?

मुंबई : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल अगदी काही तासांवर येऊन ठेपलेला असताना तसेच ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या राजीनाम्याच्या निर्णयाने महाराष्ट्राचं राजकारण एका वेगळ्या वळणावर येऊन ठेपलेलं आहे. सत्तासंघर्षाच्या निकालात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना साथ दिलेल्या १६ आमदारांचं निलंबन होईल, अशी शक्यता राजकीय जाणकार वर्तवत आहेत. तसेच अजित पवारांचा गट भाजपला साथ देईल, अशी शक्यता देखील वारंवार व्यक्त होतीये. अशा सगळ्या शक्यशक्यतांच्या परिस्थितीत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राजभवनावर राज्यपाल रमेश बैस यांच्या भेटीसाठी दाखल झालेले आहेत.महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाच्या निकालासाठी केवळ चार ते पाच तारखाच उरल्या आहेत. ८ ते १२ मे या काळात महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे निकालाला अवघे काही दिवस उरलेले असताना मुख्यमंत्री राज्यपालांच्या निमंत्रणावरुन राजभवनात पोहोचले आहेत. राज्यपालांनी भोजनाचं निमंत्रण दिल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राजभवनात गेल्याची माहिती आहे. मुख्यमंत्री-राज्यपाल ही नियमित भेट असली तरी निकालाअगोदरच्या ‘डिनर डिप्लोमसी’ची चर्चा होतीये.

कायदेमंत्री विधानसभा अध्यक्ष नार्वेकरांना भेटले, आज मुख्यमंत्री राज्यपालांच्या भेटीसाठी!

शिंदेंना साथ दिलेल्या १६ आमदारांच्या अपात्रेसंदर्भात सुप्रीम कोर्टाचा प्रलंबित निकाल तसेच शरद पवार यांच्या निवृत्तीच्या घोषणेच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय कायदामंत्री किरेन रिजिजू यांनी केंद्रातील भाजप नेतृत्वाच्या सांगण्यावरून मुंबईमध्ये येऊन विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेतली. बंद दाराआड झालेल्या या चर्चेत बदलत्या राजकीय परिस्थितीच्या अनुषंगाने राज्यातील सध्याच्या सरकारमध्ये कोणती नवी समीकरणे जुळवता येतील, याविषयी कायद्याच्या दृष्टीकोनातून चर्चा झाल्याचे खात्रीलायकरित्या समजते.

या भेटीनंतर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजभवनावर जाऊन राज्यपाल बैस यांची भेट घेतली. राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना भोजनाचं निमंत्रण दिलं होतं. यावेळी मुख्यमंत्री-राज्यपालांमध्ये राजकीय चर्चा होण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed