चाहत्यांची एकच गर्दी उसळली
सचिनच्या नागपूर विमानतळावर आगमनाची बातमी समजताच चाहत्यांची एकच गर्दी उसळली होती. विमानतळावर सुरक्षा दलाच्या जवानांनीही सचिनचे जोरदार स्वागत केले. बुद्ध पौर्णिमेनिमित्त गुरुवारी वन्य प्राण्यांची गणना होणार आहे. जर सर्व काही ठीक झाले आणि हवामान स्वच्छ असेल तर सचिनला चांदण्यारात्रीही वन्य प्राणी दिसतील अशी अपेक्षा आहे.
बुद्ध पौर्णिमेनिमित्त सचिन तेंडुलकर पत्नीसह ताडोबाला, नागपूर विमानतळावर स्पॉट!
फेब्रुवारी महिन्यातही सचिनने ताडोबात सफारी केली होती. त्यावेळी त्याला तारा, माया, बिजली व काळ्या बिबट्याचे दर्शन झाले. झुनाबाईचे विशेष आकर्षण असल्याने सचिन तीन दिवस ताडोबा मुक्कामी होते. त्याच्यासमवेत पत्नी अंजली तेंडुलकर व काही मित्रदेखील होते. सचिननी तेव्हा उमरेडजवळील करांडलामध्ये सुध्दा सफारी केली होती. त्या ठिकाणी त्यांना वाघांचे दर्शन झाले.
सचिनला झाले होते वाघ, अस्वलाचे दर्शन
मात्र, झुनाबाईच्या प्रेमात असलेला सचिन तेथून थेट ताडोबात दाखल झाला. यावेळी त्याला तारा वाघिणीचे तिच्या दोन बछड्यासह दर्शन झाले. तसेच त्याला अस्वलही पहाता आले. दुपारची सफारी कोलारा गेटवरून केली असता माया वाघिणीचे तिच्या बछड्यासह तसेच बिजली वाघिणीनेही सचिनला दर्शन दिले. याच वेळी त्याला काळा बिबटही दिसला होता.