महिलेनं बाळाला जन्म दिल्यानंतर विचारलं? आता कुठलं स्टेशन गेलं. तर यावेळी उपस्थित सर्वांनी सांगितलं, नाशिक रोड. म्हणून त्या महिलेनं आपल्या बाळाचं नाव ‘नाशिक’ ठेवलं. मुंबईहून सुटलेली रेल्वे नाशिकच्या रेल्वे टेशनवर आल्यानंतर रेल्वेत बाळाला जन्म दिला. बाळाचा जन्म होताच महिलेचा आनंद गगनात मावेनासा झाला. मग या महिलेनं आनंदाच्या भरातच आपल्या बाळाचं नाव ‘नाशिक’ ठेवलं.
मुंबईहून निघालेल्या सेवाग्राम एक्सप्रेसमध्ये महिलेला नाशिकरोड रेल्वे स्टेशन जसं जसं जवळ येऊ लागलं, तसं तसं प्रसूतीकळा येऊ लागल्या. या असह्य वेदना पाहून रेल्वेतून प्रवास करणाऱ्या इतर महिलांचाही थरकाप झाला. परंतु सर्व महिलांनी यावेळी प्रसंगावधान दाखवलं. गर्भवती महिले भोवती गोळा झाल्या आणि नैसर्गिक प्रसूती होण्याची वाट पाहू लागल्या. या डब्यातील सर्वांच्या मनातील चलबिचल सुरू झाली आणि सर्वांचं लक्ष केंद्रीत झालं त्या असह्य वेदना देणाऱ्या प्रसूती कळा येऊ लागलेल्या महिलेकडे. महिलेची नैसर्गिक सुखरूप प्रसूती व्हावी, यासाठी सर्वांनी प्रार्थना केली. तेवढ्यातच नाशिकरोड रेल्वे स्टेशन काही अंतर क्रॉस झालं आणि सेवाग्राम एक्सप्रेसच्या डब्यात टाळ्यांचा कडकडाट होऊन जल्लोष झाला. या महिलेनं एका गोंडस बाळाला जन्म दिला. सेवाग्राम एक्सप्रेसच्या डब्यात असलेल्या सर्वांच्या लक्षात राहील असा ही अविस्मरणीय क्षण होता.
बाळ जन्माला आलं की त्याचं बारसं करून नाव ठेवतात. यावेळी एक ना अनेक नावं मोठ्या हौसेने सुचवली जातात आणि अखेरीस सर्वांच्या आवडीचं नाव दिलं जात. तर अनेक जण नाव रास शोधण्यासाठी किंवा राशीनुसार असलेल्या अक्षरांवरून नाव ठेवतात. काही जण एखाद्या चित्रपटातील अभिनेता, अभिनेत्रीच्या असलेल्या नावावरून बाळाचं नाव ठेवतात. तर काही अर्थपूर्ण नाव ठेवत असतात. परंतु नाशिकच्या स्थानकावर रेल्वेत जन्मालेल्या बाळाचं नाव आईनं नाशिक ठेवलं आहे.