Ganeshotsav 2026: गणेशोत्सवाला अवघे दोन दिवस बाकी असताना ठाणे पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत गणेशोत्सव निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त केला आहे.
पोलिसांचा चोख बंदोबस्त
यंदा ठाणे, भिवंडी, कल्याण-डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर आणि उल्हासनगर या ठाणे पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीतील शहरांमध्ये १ लाख ६६ हजार ५२४ गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना होणार आहे. गणेशोत्सव निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी ठाणे पोलिसांनी कंबर कसली असून, गणेशोत्सवाच्या काळात १२ दिवस प्रत्येक शहरात पोलिसांचा चोख बंदोबस्त असणार आहे.
विसर्जनाची ठिकाण
यंदा आयुक्तालयात प्रतिष्ठापना होणाऱ्या एकूण गणपतींपैकी सार्वजनिक गणपतींची संख्या १ हजार ७६ असून, १ लाख ६५ हजार ४४८ खासगी गणपती आहेत. आयुक्तालयातील विसर्जनाच्या ठिकाणांची एकूण संख्या १९३ आहे.यामध्ये ठाणे शहरात ५५, भिवंडीत ३९, कल्याण परिमंडळात ५६ आणि उल्हासनगर परिमंडळात ४३ ठिकाणांचा समावेश आहे.
१२ विसर्जन घाट
अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली. खारेगाव, पारसिक रेतीबंदर, मालुंदा तलाव, नदी नाका, वऱ्हाळदेवी, मोठागाव रेतीबंदर खाडी यांसह इतर महत्त्वाच्या विसर्जन घाटांची संख्या १२ आहे.
पोलिस आयुक्तालयात तैनात
गणेशोत्सव शांततेत पार पाडण्यासाठी ठाणे पोलिस सज्ज झाले आहेत. पोलिस अधिकारी आणि कर्मचारी मिळून ३,३००हून अधिक पोलिसांचा फौजफाटा संपूर्ण पोलिस आयुक्तालयात तैनात करण्यात येणार आहे. दिवस-रात्र पोलिसांचा खडा पहारा असणार आहे.
Nashik Crime : देशसेवेच्या स्वप्नाने सैन्यात भरती, २० वर्षीय प्रशिक्षणार्थी अग्निवीराने अकस्मात आयुष्य संपवलं, नाशकात खळबळ
बंदोबस्तासाठी एसआरपीएफच्या कंपन्या तैनात
या फौजफाट्यामध्ये १० पोलिस उपायुक्त, १८ सहायक पोलिस आयुक्त, १०० पोलिस निरीक्षक, २८२ सहायक पोलिस निरीक्षक/पोलिस उपनिरीक्षक, ५३ महिला पोलिस अधिकारी, २,२९४ पोलिस कर्मचारीआणि ६१३ महिला पोलिस कर्मचारी यांचा समावेश आहे. बंदोबस्तासाठी एक हजार होमगार्डची मदत घेण्यात येणार आहे. यात ८०० पुरुष आणि २०० महिला होमगार्ड असतील. एसआरपीएफच्या काही कंपन्याही बंदोबस्तासाठी तैनात राहणार आहेत.
