• Sun. Sep 13th, 2026

Accident News: पत्नीला प्रसूतीसाठी माहेरी सोडलं, परतताना कार 20 फूट खोल खड्ड्यात कोसळली, पतीसह मित्राचा करुण अंत; होणाऱ्या लेकराचा चेहरा पाहिला नाही

Manchar Car Accident: मोरडेवाडी हद्दीत भरधाव इको कार रस्त्यालगतच्या वीस फूट खोल खड्ड्यात कोसळल्याने दोघांचा करुण अंत झाल्याची घटना घडली आहे.

(फोटोमहाराष्ट्र टाइम्स)
म. टा. वृत्तसेवा, मंचर : पत्नीला प्रसूतीसाठी करंजविहीरे येथे सोडून गाडीतून मित्रांसह परतणाऱ्या दोघावर काळाने घाला घातला. पुणे-नाशिक महामार्गावर मंचर बाह्यवळण मार्गावर शुक्रवारी रात्री हा अपघात झाला. मोरडेवाडीच्या हद्दीत गाडी वीस फूट खोल खड्ड्यात कोसळल्याने दोघांचा मृत्यू झाला.

आनंदराव शंकर कोळेकर (वय ५३, रा. करंजविहिरे) आणि किरण बाबूराव डुंबरे (वय ३५ रा. दावडी) अशी मृतांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दावडी येथील किरण डुंबरे हे त्यांच्या पत्नीला करंजविहीरे येथे प्रसूतीसाठी सोडण्यास गेले होते. त्यांच्यासोबत मित्र आनंदराव कोळेकर होते. पत्नीला सोडल्यानंतर दोघे गाडीतून आळेफाटा येथे उपचार घेत असलेल्या नातेवाइकाला भेटण्यासाठी निघाले होते. कोळेकर गाडी चालवीत होते. पुणे-नाशिक महामार्गावर मंचर बाह्यवळण मार्गावर मोरडेवाडी गावच्या हद्दीत गाडी आली असता चालकाचे नियंत्रण सुटल्याने गाडी वीस फूट खोल खड्ड्यात कोसळली.

Maharashtra TimesPune Crime : उसने घेतलेले 600 रुपये परत मागितले, संतापात आईला शिवीगाळ; पुण्यात मित्रानेच काढला मित्राचा काटाया अपघातात कोळेकर व डुंबरे गंभीर जखमी झाले. विजय तांबडे, संतोष ढमाले यांच्यासह ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन दोघांना उपचारासाठी तातडीने मंचर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या अपघातात गाडीचा चक्काचूर झाला आहे.

Maharashtra TimesBaramati Crime : बारामतीकर तरुणीने घर सोडलं, ओळखीतील तरुणाचा विचित्र दबाव, महिला पोलिसांचं संवेदनशील समुपदेशन, लेक आईच्या मिठीत विसावलीदुसरी घटना: ससूनमधील प्रसूती कक्षाचे छत कोसळले

पुणे : ससून रुग्णालयातील नुकतेच नूतनीकरण केलेल्या प्रसूती विभागातील एका कक्षाचे छत शुक्रवारी रात्री अचानक कोसळले. या घटनेत रुग्ण किंवा कर्मचाऱ्यांना दुखापत झाली नाही. या कक्षाचे काम अद्याप सुरू असून, तेथे रुग्ण दाखल नव्हते, असा दावा ससून रुग्णालय प्रशासनाने केला. घटनेची माहिती घेऊन पुढील कार्यवाही केली जाईल, असेही प्रशासनाने सांगितले. ससून रुग्णालयाच्या जुन्या इमारतीच्या नूतनीकरणाचे काम गेल्या काही महिन्यांपासून सुरू आहे. तिसऱ्या मजल्यावरील स्त्रीरोग व प्रसूतिशास्त्र विभागातील काम नुकतेच पूर्ण झाले आहे. शुक्रवारी रात्री या विभागातील एका प्रसूती कक्षाच्या छताचा काही भाग कोसळला. स्लॅबमधून पाणी गळत असल्याने छताचा भाग कोसळल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

शैक्षणिक पात्रता
किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.… आणखी वाचा