Nagpur News: हॉटेलमधील सर्व कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची ओळखपत्रे, रहिवासी दाखले आणि फोन क्रमांकांची अद्ययावत माहिती मालकांकडे ठेवणे बंधनकारक असेल.
OYO सह विविध हॉटेल्सवर 90 दिवसांचं चित्रिकरण ठेवावं लागणार, पोलिसांकडून कडक निर्बंध(फोटो– Lipi)
नागपूर : नागपूर शहरातील OYO, हॉटेल्स, लॉज, गेस्ट हाऊस आणि होम-स्टेमध्ये सुरू असलेल्या विविध प्रकारांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी आता कडक पावले उचलली आहेत. ‘ऑपरेशन शक्ती’च्या माध्यमातून हॉटेल आणि लॉजिंग व्यवसायातील बेकायदेशीर प्रकारांवर पोलिसांची करडी नजर राहणार असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या हॉटेल मालक किंवा व्यवस्थापकांविरुद्ध थेट कायदेशीर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. मानवी तस्करी, बेकायदेशीर देहविक्री, फसवणूक तसेच अन्य गैरप्रकार रोखण्यासाठी ही कडक नियमावली लागू करण्यात आली आहे.
पालकमंत्री तथा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सूचनेनुसार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी यासंदर्भात अधिसूचना जारी केली आहे. सप्टेंबर 2026 ते 9 नोव्हेंबर 2026 या कालावधीत ही नियमावली लागू राहणार आहे. नियमांचे पालन न करणाऱ्या आस्थापनांविरुद्ध पोलिसांकडून कठोर कारवाई केली जाणार आहे.
नियमावलीनुसार प्रत्येक OYO आणि इतर हॉटेलच्या मुख्य भागात ‘मानवी तस्करी आणि बेकायदेशीर कामांना थारा दिला जाणार नाही’ असा ‘झिरो टॉलरन्स’ बोर्ड लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. हॉटेलमध्ये ग्राहकांना खोली देण्यापूर्वी त्यांचे मूळ ओळखपत्र तपासावे लागणार असून, संबंधितांची संपूर्ण माहिती रजिस्टर किंवा डिजिटल प्रणालीमध्ये नोंदवावी लागणार आहे. ओळखपत्रावर जन्मदिनांक आणि स्थायी पत्ता असणे आवश्यक आहे. पॅन कार्ड सामान्यतः ओळखपत्र म्हणून स्वीकारले जाणार नाही.
हॉटेलमध्ये राहणाऱ्या व्यक्तींच्या वयाची आणि निवासाची योग्य पडताळणी करून त्याची नोंद ठेवणेही बंधनकारक करण्यात आले आहे. दोन्ही व्यक्ती 18 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या असल्यास त्यांच्या संमतीने हॉटेलमध्ये राहणे कायदेशीर असले, तरी ओळख आणि वयाची पडताळणी करणे हॉटेल व्यवस्थापनाची जबाबदारी राहणार आहे. अल्पवयीन व्यक्तींच्या प्रवेशाबाबत विशेष खबरदारी घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. पालक सोबत नसल्यास अल्पवयीनांना प्रवेश देता येणार नाही. तसेच हॉटेलच्या सुरक्षेच्या दृष्टीने प्रवेशद्वारापासून लॉबीपर्यंत 24 तास सीसीटीव्ही सुरू ठेवणे आवश्यक करण्यात आले आहे. या सीसीटीव्हीचे किमान 90 दिवसांचे फुटेज जतन करावे लागणार आहे. कॅमेरे नादुरुस्त आढळल्यास ते तातडीने दुरुस्त करण्याचे निर्देश आहेत.
दरम्यान, नागपूर पोलीस आणि OYO कंपनीने संयुक्त कारवाई करत अनधिकृतपणे OYOचे नाव वापरणाऱ्या 20 पेक्षा अधिक हॉटेल्सचे साईनबोर्ड हटवले असून संबंधितांवर कायदेशीर कारवाई सुरू आहे. त्यामुळे OYOच्या नावाचा अनधिकृत वापर करणाऱ्या हॉटेल्सनाही आता लगाम बसणार आहे. ‘नागपूर शहरात प्रत्येक दोन हॉटेलच्या बाजूला OYOचा बोर्ड लागत आहे. हॉटेलच्या आजूबाजूच्या नागरिकांच्या मोठ्या प्रमाणात तक्रारी आहेत. याबाबत पोलीस आयुक्तांसोबत चर्चा झाली असून मुख्यमंत्र्यांनाही हा विषय सांगितला होता. मुख्यमंत्र्यांनीही याला गांभीर्याने घेतले आहे. आयुक्तांनी चांगली नियमावली तयार केली आहे. आता OYO हॉटेलमध्ये जाताना सर्व रेकॉर्ड ठेवावे लागणार असून, पोलिसांची कडक नजर OYOवर असणार आहे. जिल्ह्यातील सांस्कृतिक आणि सामाजिक परंपरा बिघडणार नाही, याची काळजी घेण्यात आली आहे,’ असे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.
लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.
पत्रकारितेतील अनुभव
अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.
मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU
शैक्षणिक पात्रता
अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा